Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedphoto कन्नड घाटाच्या दुर्देशेचे हे १५ फोटो तुम्ही पहिले नसणार

photo कन्नड घाटाच्या दुर्देशेचे हे १५ फोटो तुम्ही पहिले नसणार

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

गौतळा डोंगर (Gautala mountain) परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे कन्नड घाटाची (Kannada Ghat) दुर्देशा झाली आहे. मंगळवारच्या या घटनेनंतर बुधवारी या रस्त्याची परिस्थिती फोटोच्या माध्यमातून मांडली आहे मनोहर कांडेकर यांनी

- Advertisement -

Video चाळीसगाव : कन्नड घाट वाहतुकीसाठी महिनाभर बंद ?

दरड कोसळल्यामुळे संपुर्ण रस्ता बंद झाला आहे. प्रशासनाकडून दगड व मातीचा मलबा हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.

घाटातील म्हसोंबा मंदिराजवळील पडलेला मोठा दगड बाजूला करण्याचे काम चालू आहे. मोेठ्या प्रमाणा पाण्याचा प्रवाह, दगड व मातीमुळे रस्त्यावरील कठडे ठिक-ठिकाणी तुटले आहेत.

अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. त्याला तडे गेल्यामुळे घाटाच्या दुरुस्तीसाठी किमान महिनाभराचा कालवधी लागणार आहे. त्यामुळे पुढील महिनाभर तरी घाट वाहतुकीसाठी बंद राहण्याची शक्यता आहे.

घाटात बंचाव कार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल (NDRF team) (एसडीआरएफ टिम,धुळे) तैनात केली आहे.

दरड कोसळली त्यावेळी रस्त्यावरुन जाणारी वाहने नादुरस्त होऊन जागीच थांबली आहे. या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

चिखलात रुतलेली ३० ते ४० वाहने गाळातून चार ते पाच जेसीबीच्या साह्याने काढली जात आहेत. तर १०० ते १५० पडलेली झाडे बाजूला केली आहेत.

दगड व पाण्यामुळे घाटातील रस्ता ठिक-ठिकाणी खचला असून कमजोर झाला आहे.

म्हसोंबा मंदिराजवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल व दगड पडलेले असल्यामुळे त्याठिकाणाहुन चार ते पाच जेसीबीच्या साह्याने मलबा बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

दगड व पाण्यामुळे घाटातील रस्ता ठिक-ठिकाणी खचला असून कमकुवत झाला आहे. त्यावर लगेच वाहतुक सुरु केली तर अजुन जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारात येत नाही.

पुढील किमान महिनाभर तरी घाटात वाहतुकीसाठी बंद राहण्याची शक्यता आहे.

कन्नड घाटातील रस्ता पावसामुळे बहूतांश ठिकाणी ठिसूळ झाल्याने, रस्ता खचून एक आयशर घाटातून खोल दरीत कोसळली असून या घटनेत आयशरचा चालक मरण पावला आहे

प्रशासनाकडून रस्ता कधी सुरु होईल, यासंदर्भात अजून अधिकृत माहिती दिली नाही.

मोेठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह, दगड व मातीमुळे रस्त्यावरील कठडे ठिक-ठिकाणी तुटले आहेत.

घाटातील रस्ता लवकरात लवकर सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या