उद्योगांच्या सुरक्षिततेवर विशेष लक्ष देण्याची गरज: पोलीस आयुक्त

दिवाळीच्या सुटीतील उद्योगांच्या चर्चा
उद्योगांच्या सुरक्षिततेवर विशेष लक्ष देण्याची गरज: पोलीस आयुक्त

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

उद्योगांच्या सुरक्षिततेचा प्रश्न (SECURITY OF INDUSTRIES) महत्त्वाचा असतानाही तो ‘नॉन बजेटेड’ (Non budgeted) गटात ठेवला जातो, त्याला ‘बजेट’ क्षेत्रात आणून त्यावर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Police Commissioner Jayant Naiknavare) यांनी पत्रकार परिषदेत केले.

आयमाच्या पुढाकाराने दिवाळीच्या (diwali) सुटीच्या पार्श्वभूमीवर उद्योग क्षेत्राच्या (Industry sector) सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासन, एजन्सीज व उद्योजकांची संयुक्त बैठक आयाजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Police Commissioner Jayant Naiknavare) यांनी उद्योजकांशी संवाद साधला.

यावेळी व्यासपिठावर आयमा अध्यक्ष निखील पाचाळ, सरचिटणिस ललित बूब, बीओटी समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे, पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त सोहील शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वपोनि भगिरथ देशमुख, सातपूर पोलीस वपोनि महेंद्र चव्हाण, आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, माजी अध्यक्ष धनंजय बेळे, जे. आर. वाघ, स्वर्णसिंग बिरदी, राजेंद्र अहिरे हे होते.

यावेळी उद्योजक व पोलिसांच्या (police) समन्वयाने नेमल्या जाणार्‍या बंदोबस्तासह केल्या जाणार्‍या उपाययोजनांमुळे मागील 12 वर्षांत दिवाळीच्या सुट्यांमध्ये (Diwali holidays) एकही चोरीची घटना (case of theft) न घडल्याबद्दल उद्योजकांनी समाधान व्यक्त केले. कारखान्याच्या परिसरात वैयक्तीक अथवा पध्दतीने सुरक्षा रक्षक नेमणे, कारखान्याभोवती सीसीटीव्ही यंत्रणा लावणे, परिसरात उजेड योग्य पध्दतीने नियोजन करणे, भंगार विक्रेत्यांना सुटी काळात मज्जाव करणे, अत्यावश्यक काळात 112 क्रमांकावर फोन केल्यास तातडीने पोलीस मदत मिळू शकते, यासाठी सुरक्षा रक्षकाना जागरुक करणे, आदी सूचना देण्यात आल्या.

यावेळी बोलताना सातपूर (satpur) व अंबड (ambad) भागातील 62 लोकांच्या तडीपारीचे दाखल झालेले आहेत. बहुतांश लोकांना नोटीस अदा केलेल्या आहेत. परिसरातील टवाळखोरांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली असल्याचे सांगून उद्योजकांनी स्वत:च्या सुरक्षिततेचे अतिरिक्त नियोजनही करावे, बोनस (Bonus) देताना तो दिवसपाळीतच वाटप करण्याचे आवाहन उपायुक्त विजय खरात (Deputy Commissioner Vijay Kharat) यांनी केले.

यावेळी सुरक्षिततेसाठी उद्योजकांद्वारे सातपूर व अंबडसाठी वाहन उपलब्ध करुन देण्यात येणार असून, सोबतच सुरक्षा रक्षक उपलब्ध करुन दिले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. कार्यक्रमातील चर्चेत सुदर्शन डोंगरे, गोविंद झा, जगदीश पाटील, विनीत पोळ, सिध्देश रायकर, हर्षद ब्राम्हणकर, दिलीप वाघ, अविनाश मराठे, योगिता आहेर, हर्षद बेळे आदींसह सुरक्षा रक्षक एजन्सिजचे प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.

उद्योजकांनी जागरुक राहण्याची गरज

उद्योजक दिवसा उद्योगाच्या ठिकाणी त्यांनी रात्रीचा वॉक उद्योग क्षेत्रात घेण्यास सुरुवात केल्यास उद्योगांचे वेगळे चित्र दिसेल, असे पोलीस आयुक्त नाईकनवरे यांनी सांगितले. चोर्‍यांच्या प्रकारात मोठा झटका हा ऑनलाईन चोर्‍यांमुळे सध्या होत आहे. त्याबाबत उद्योजकांनी जागरुक राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com