Monday, April 29, 2024
Homeदेश विदेशप्रजासत्ताक दिनी मोदींना धोका, गुप्तचर संस्थांकडून अलर्ट

प्रजासत्ताक दिनी मोदींना धोका, गुप्तचर संस्थांकडून अलर्ट

प्रजासत्ताक दिनी (Republic Day celebration)पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि इतर मान्यवरांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संदर्भात गुप्तचर यंत्रणांना सुगावा लागला आहे. नऊ पानांच्या गोपनीय अहवालातून ही बाब समोर आली आहे. ‘इंडिया टुडे’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

Video मुख्यमंत्र्यांसाठी वाहतूक थांबवली, सीएमने फटकारले, म्हणाले…कोणी राजे आलेत का?

- Advertisement -

या गोपनीय अहवालात लष्कर-ए-तोयबा (Lashkar-e-Taiba), द रेझिस्टन्स फोर्स, जैश-ए-मोहम्मद, हरकत-उल-मुजाहिदीन आणि हिज्बुल-मुजाहिदीन यांसारख्या दहशतवादी गटांचा या संभाव्य कटामागे हात असल्याचे म्हटले आहे. प्रजासत्ताकदिनाच्या समारंभासाठी कजाकिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या राष्ट्रांच्या मान्यवरांना निमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी व या मान्यवरांच्या जीवाला धोका असल्याचे अहवालात सांगण्यात आलं आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या क्षेत्राबाहेरील गटांकडून हा कट रचला जाऊ शकतो. सार्वजनिक ठिकाणे, महत्त्वपूर्ण आस्थापने आणि गर्दीच्या ठिकाणी दहशत निर्माण करणे हा त्याचा उद्देश आहे.

बुस्टर डोससाठी पात्रता, अटी काय? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

पाकिस्तानमधील खलिस्तानी गट पंजाबमध्ये पुन्हा एकत्र येण्यासाठी आणि दहशतवादी कारवाया सुरू करण्यासाठी केडरला एकत्र करत आहेत. ते पंजाब आणि इतर राज्यांमध्ये हल्ल्यांची योजना आखत असल्याची देखील माहिती यंत्रणांना मिळाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या