पीएमएस प्रणाली बंदवर शिक्कामोर्तब?

निर्णय प्रतीची आज शक्यता
जिल्हा परिषद
जिल्हा परिषद

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जिल्हा परिषदेत (zilha parishad) कामांची बिले (Bills of works) देण्यासाठी कार्यन्वित असलेली पीएमएस प्रणाली (PMS system) बंद करण्याच्या निर्णयावर मंत्रालयात (ministry) शिक्कामोर्तंब झाल्याचे वृत्त आहे.

गुरूवारी (दि.20) ही प्रत मिळण्याची शक्यता आहे. ठेकेदारांनी (contractors) कामे केल्यानंतर त्यांच्या कामांची बिले देण्यासाठी पीएमएस प्रणाली कार्यान्वित आहे. मात्र आता ती बंद झाल्याने ठेकेदारांना कामांची बिले ऑफलाईन (Offline) मिळणार आहे.

गत महिन्यात वीस दिवस बंद असलेली जिल्हा परिषदेत (zilha parishad) ठेकेदारांनी कामे केल्यानंतर त्यांचे बीले (bills) देण्यासाठी कार्यन्वीत असलेली पीएमएस प्रणाली (PMS system) पुन्हा तीन दिवसांपासून ठप्प झाली आहे. पीएमएस या प्रणालीची सेवा पुरवणार्‍या सीडॅक (Cedac) या कंपनीशा करार संपुष्टात आला असून शासनाकडून कराराचे नूतनीकरण न केल्याने ही प्रणाली बंद करण्यात आली आहे.

ऐन दिवाळीच्या (diwali) तोंडावर प्रणाली बंद झाल्याने ठेकेदार अडचणीत सापडले आहेत. यावर सीडॅक कंपनीने पीएमएस बंद केली असून पुढील सेवा देण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. ठेकेदारांना बिले वेळेत मिळावी यासाठी त्यांच्याकडून तगादा लावला जात आहे. पीएमएस प्रणाली पूर्ववत सुरू होईपर्यंत ऑफलाईन बिले (Offline bills) देण्यास परवानगी मिळावी, असा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता.

या प्रस्तावावर मंत्रालयात निर्णय झाला झाला असून पीएमएस प्रणाली ही कायमस्वरूपी बंद निर्णय झाला असल्याचे कळते. या फाईलवर स्वाक्षरी होऊन ऑफलाईन बिले देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र आदेशाची प्रत अद्याप जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झालेली नाही. ही प्रत प्राप्त होताच रखडलेली सर्व बीले ही ऑफलाईनने दिली जाणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com