मनपात खर्चाला कात्री, कोटींची बचत

मनपात खर्चाला कात्री, कोटींची बचत

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेत (Nashik Municipal Corporation) आयुक्त (Commissioner) तथा प्रशासक म्हणून आलेले रमेश पवार (ramesh pawar) यांनी पहिल्या दिवसापासून महापालिका प्रशासनात (municipal administration) शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी आर्थिक शिस्त (Financial discipline) लावण्यासाठी विविध पद्धतीने काटकसरीचे धोरण सुरू केले आहे.

यामुळे आतापर्यंत सुमारे दोनशे कोटी रुपयांची बचत (Saving) झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान,ऑर्डर होऊन देखील जी कामे सुरू झालेली नाही तसेच कामे सुरू होऊनही खूप दिवसांपासून काम रंगाळले आहे अशा कामांची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे फर्मान महापालिका आयुक्तांनी काढले आहेत. त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात महापालिकेची आर्थिक बचत (Financial saving) होणार असल्याचे दिसत आहे.

त्याच बरोबर तब्बल अडीचशे कोटी रुपये खर्च करुन उंटवाडी व मायको सर्कल येथे दोन उड्डाणपूल (flyover) बांधले जाणार होते. मात्र या दोन्ही उड्डाणपूलांची आवश्यकताच का? असा सवाल करण्यात येत होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी पालिकेची आढावा बैठक (Review meeting) घेतली. यावेळी आयुक्त रमेश पवार यांनी मायको सर्कल येथील उड्डाणपूलाला स्थगिती दिल्याचे सांगितले. यावेळी ना.भुजबळांनी उंटवाडी पुलाचीही व्यवहार्यता तपासण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या होत्या. दरम्यान, ज्या ठेकेदार कंपनीला या दोन्ही उड्डाणपूलाचे काम मिळाले होते. आता या कंपनीकडून उंटवाडी येथील पुलाचे काम करण्यालाच नकार दिला आहे.

मायको सर्कल उड्डाणपुलाचे (flyover) काम न मिळू शकल्याने संबंधित कंपनी नाराज झाल्याची चर्चा असून त्यातून त्यांनी उंटवाडी उड्डाणपुलाच्या कामास नकार दिल्याचे समजते. मायको सर्कलच्या उंटवाडी येथील उड्डाणपुलाला स्थगिती दिल्यानंतर तेथे वाहतूक किती प्रमाणात होते, कोणत्या वेळी होते, वाहनांची संख्या दरर्रोज किती असते, याची माहिती त्रयस्थ एजन्सीकडून घेतली जात आहे. तर उंटवाडीतील पुलाची व्यवहार्यता तपासली जात आहे. फेरतपासणी करुन कामाची रक्कम जेवढी आहे, ती आवश्यक आहे का? याची माहिती घेतली जात आहे. या दोन्ही उड्डाणपुलासाठी प्रत्येकी 120 कोटी रुपये याप्रमाणे 240 कोटी खर्चून काम केले जाणार होते. एवढ्या कोटीच्या उड्डाणपुलामुळे हे दोन्ही पूल चर्चेत आले होते.

नुकताच पदभार सांभाळलेले आयुक्त रमेश पवार (Commissioner Ramesh Pawar) यांनी आयुक्त पदाचे सूत्रे हाती घेताच अनावश्यक खर्चाला कात्री लावण्याच्या कामास सुरवात केली. महापालिकेची आर्थिक चांगली नसल्याने त्यांच्या पाहणीत आले. त्याचाच भाग म्हणून त्यांनी 120 कोटी रुपयांचा मायको सर्कलच्या उड्डाणपूलाला थेट कात्री लावली. हे करताना आपोआप उंटवाडी येथे होणार्‍या उड्डानपुलाच्या कामावर देखील स्थगितीचे ढग होते. मात्र या कामाला पालिकेकडून हिरवा कंदील देण्यात आला. संबंधित ठेकेदार मात्र आता हे काम करायला तयार नसल्याचे चित्र आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक महानगरपालिकेचे वातावरण भूसंपादनावरुन (Land acquisition) चांगलेच ढवळून निघाले आहे. 800 कोटीचे व्यवहार उच्चस्तरीय समिती तपासणार आहे. त्यातच अडीचशे कोटी खर्चून बांधले जाणारे दोन्ही उड्डानपूल देखील चर्चेत होते. एकीकडे भूसंपादन करताना प्राधान्यक्रमाने ते केलेले नाही. तसाच प्रकार या दोन्ही उड्डानपूलांच्या कामात तशी व्यवहार्यता तपासली गेली का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

Related Stories

No stories found.