Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याशहरातील 'इतक्या' शाळा होणार स्मार्ट

शहरातील ‘इतक्या’ शाळा होणार स्मार्ट

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहराच्या विकासाला दिशा देण्यासाठी स्मार्ट सिटीच्या (Smart City ) माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यातील महत्त्वाचा असलेला ‘स्मार्ट क्लास’ ( Smart Class)हा उपक्रम गतिमान करण्यात आला असून, येत्या जूनमध्ये शाळा उघडण्यापूर्वी शहरातील 69 शाळा स्मार्ट करण्याचा निर्धार स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंंत मोरे यांनी केला आहे.

- Advertisement -

खासगी शाळांच्या तुलनेत शासकीय शाळा मागे पडत असल्याने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहराच्या सर्वेक्षणानंतर शहरातील 69 शाळांच आधुनिकीकरण करण्याचा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या डिजिटलायजेशन प्रक्रियेत शहरातील 69 शाळांच्या 656 वर्गांना आधुनिकतेचा साज चढवला जाणार आहे. यात प्रामुख्याने प्रत्येक वर्गामध्ये डिजिटल टच पॅनल (फळे)उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्मार्ट स्कूलचे प्रशिक्षण देण्यासाठी लागणारे डिजिटल अभ्यासक्रम इंग्लिश मराठी आणि उर्दू या भाषांमध्ये शाळांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. या अभ्यासक्रमाचे शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनाही तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या उपक्रमांतून 69 शाळेत डिजिटलसोबतच ग्रीन बोर्ड, शाळेतील तुटलेल्या बेंचेसच्या जागी नवे बेंचेस, खराब झाल्यावर रंगरंगोटी करण्यात येणार आहे. तसेच स्मार्ट सिटीचा मुलामा लावताना या 69 शाळांमध्ये अद्यावत कॉम्प्युटर लॅब उभारण्यात येणार आहे. या सर्व यंत्रणा कार्यरत राहण्यासाठी शाळेला ब्रॉडबँड कनेक्शन दिले जाईल.

या सोबतच शाळेत हजेरीसाठी बायोमेट्रिक यंत्रणा उभारली जाणार आहे. शाळेचे कामकाज सुलभतेने करता यावी, यासाठी मुख्याध्यापकांंना टॅब दिला जाणार आहे. तसेच शिक्षक रूममध्ये सीसीटीव्ही मॉनिटर प्रिंटर व एक डेस्कटॉप दिले जाणार आहे. शिक्षण शासनाच्या मान्यता प्राप्त संस्थेकडून घेतले जाणार आहे.

शाळांमध्ये असणार्‍या सुविधांची देखभाल सुरळीत राहावी, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. या संदर्भात काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेली असून लवकरच अहोरात्र काम करून 69 शाळांमधील 656 वर्ग जून 2023 पूर्वी स्मार्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत

– सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी

- Advertisment -

ताज्या बातम्या