कोरोना वाढताच शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद

कोरोना वाढताच शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद
महाविद्यालय

राज्यातील कोरोना केसेसचे (corona cases)प्रमाण पुन्हा एकदा वाढू लागले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसरकार पुन्हा कडक निर्बंध लागू करण्याच्या तयारीत आहे. आता मुंबईतील (mumbai)वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पहिली ते आठवीच्या शाळा (school)मुंबईत 31 जानेवारीपर्यंत ऑफलाईन बंद राहणार आहे. ऑनलाईन शिक्षण (online education) मात्र सुरू राहणार आहे.

महाविद्यालय
कोरोनाच्या सुपर स्प्रेडर विवाहातील नवरीही पॉझिटिव्ह, अनेक मोठ्या नेत्यांना लागण

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही दोन दिवसांपुर्वीच शाळा बंद करण्याचे संकेत दिले होते. ओमिक्रॉन आणि कोरोनाचे रुग्ण वाढल्यास आम्ही शाळा बंद करू, अशी माहिती त्यांनी दिली होती.

1 डिसेंबरपासून राज्यातील ग्रामीण भागात सर्व शाळा सुरू झाल्या तर डिसेंबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यापासून मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद या शहरांमध्येही इयत्ता पहिलीपासूनचे वर्ग सुरू झाले. आता मुंबईतील शाळा बंद झाल्यानंतर ज्या शहरात रुग्ण वाढले आहेत, त्या ठिकाणी शाळा बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनातर्फे घेतला जाणार आहे.

महाविद्यालय
गौतमच्या गोड बातमीनंतर काजलने शेअर केले ग्लॅमरस फोटो

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढ हा चिंतेचा विषय ठरु लागला होता. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णवाढ असताना मुलांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगितलं जातं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com