
मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शाळा, महाविद्यालयांना (Schools, colleges) टाळं लागलं होतं. यानंतर सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याने राज्यातील शाळा 1 डिसेंबरपासून सुरु करण्यास राज्य सरकारने (Maharashtra Government) परवानगी दिली. परंतु ओमायक्रॉनमुळे देशात रोज 14 लाख नवे रूग्ण आढळण्याची भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्राने राज्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. हे लक्षात घेता शाळांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालाच तर शाळा पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात ओमायक्रॉन रुग्णाची नोंद झाली. आता हा आकडा 50 च्या पुढे गेलाय. हे पाहता. ‘ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. आम्ही परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहोत,’ असं देखील गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी म्हटलं आहे.
मुंबई - 30
पिंपरी-12
पुणे ग्रामीण- 7
पुणे महापालिका-3
सातारा- 3
उस्मानाबाद- 3
कल्याण डोंबिवली- 2
बुलढाणा-1
नागपूर-1
लातूर-1
वसई विरार-1
नवी मुंबई -1
एकूण-65
यापैकी 34 रूग्णांना त्यांची RTPCR चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आलं आहे.
दुसरीकडे चंदिगड राज्यानेही वाढत्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबईतील घणसोलीमध्ये 16 विद्यार्थ्यांना लागण झाल्यानंतर तेथील शाळा बंद करण्यात आली. याबाबत देखील वर्षा गायकवाड यांना विचारण्यात आला. त्याबाबत त्या म्हणाल्या की, 'शाळा बंद करण्याचा निर्णय हा तिथल्या प्रशासनाने घेतला असेल. घणसोलीमध्ये 1 विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याने इतर विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यात 16 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले.''शाळेतल्या एका विद्यार्थ्याचे वडील परदेशातून आले होते त्यामुळे या शाळेतील 1000 विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली होती.' अशीही माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.