Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यापगार रखडला: पैशांअभावी पत्नीचा मृत्यू

पगार रखडला: पैशांअभावी पत्नीचा मृत्यू

नाशिक । Nashik
मालेगाव तालुक्यातील टोकडे येथील विद्यासागर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सत्यवती कौर विद्यालयातील सेवक…

पुनमचंद गणपत दराखा व सुरेश महारु दराखा (शिपाई) या सेवकांचे वेतन नऊ महिन्यांपासून संस्थाचालक व प्राचार्य सुनिल फरस यांनी मनमानी करत रोखुन ठेवले आहे.

- Advertisement -

याविरोधात या सेवकांनी नाशिक जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष रविंद्र जोशी यांच्या हस्ते महात्मा गांधी जयंती निमित्त प्रतिमापूजन करून उपोषणाला सुरुवात केली आहे.

दरम्यान, उपोषणकर्त्यांशीी शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, उपशिक्षणाधिकारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी चर्चा केली. मात्र, मार्ग निघाला नाही.
त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालणार असा प्रश्न पडला आहे.

हे दोन्ही सेवक सत्यवती कौर विद्यालयात सत्तावीस वर्षापासून सेवा बजावत आहेत. मागील नऊ महिन्यांपासून मनमानीने वेतन पथक कार्यालयास या सेवकांविषयी खोटे आरोप करत वातज थांबविण्यासाठी चुकीची माहिती दिली आहे. करोना-कालावधीत नऊ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने बिकट-परिस्थिती निर्माण झालेली आहे.

वरिष्ठ कार्यालयास वांरवांर पत्र देउनही योग्य ती दखल घेतली जात नाही. कोणतीही पूर्व-सुचना न देता मनमानी-पणाने वेतन रोखले गेले. पुनमचंद गणपत दराखा यांची पत्नी दीर्घ-आजाराने त्रस्त होती. पैशांअभावी पत्नीचा योग्य निदान न झाल्याने मृत्यू झाला.

पत्नीच्या मृत्यूस संस्थाचालक व प्राचार्य यांना जबाबदार धरावे. तसेच सुरेश महारु दराखा यांच्या पत्नीनेही संस्थाचालकांच्या जाचाबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पत्राद्वारे दाद मागितली होती.याविरोधात उपोषणाला बसल्याचे दराखा यांनी निवेदनात म्हटले आहे.

यावेळी संघटनेचे नाशिक तालुका अध्यक्ष आर. टी. थेटे, माहिती अधिकार कार्यकर्ते राहुल भारती, जाट महासभेचे प्रदेश महासचिव विठोबा द्यानद्यान आदींसह उपोषणकर्ते पुनमचंद दराखा व सुरेश दराखा उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या