Photo शाळेची घंटा वाजली, असा दिला विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी प्रवेश


Photo शाळेची घंटा वाजली, असा दिला विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी प्रवेश
Published on
2 min read

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर अाजपासून शाळा (school reopen)पुन्हा सुरू झाल्या. कोरोनासंदर्भात सर्व उपययोजना करत शाळेची घंटा वाजली.राज्य सरकारनं (state government)दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करुन नाशिकतल्या शाळा (nashik)सुरु झाल्या.

पालकांच्या संमतीनेच विद्यार्थी शाळेत येऊ शकणार आहेत. मध्यंतरी काही काळ शाळा सुरु झाल्या असल्या तरी दुसऱ्या लाटेनंतर त्या बंद झाल्या. तो काळ वगळता तब्बल दीड वर्षानंतर शाळेची घंटा पुन्हा वाजली.

नाशिकमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरु झाले. शाळा सुरु होणार असल्यामुळे शनिवार व रविवार या दोन दिवस शाळेच्या परिसराची स्वच्छता करून मैदानांची साफसफाई करण्यात आली.


Photo शाळेची घंटा वाजली, असा दिला विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी प्रवेश
शाहरुखने म्हटले होते, मुलाने ड्रग्स घ्यावे, डेटींग करावी अन...

तसेच प्रत्येक वर्गात सॅनिटायझरची फवारणी करण्यात अाली. शाळेची घंटा, भिंती, तसेच ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा स्पर्श होऊ शकेल अशा सर्वच ठिकाणी औधांची फवारणी करण्यात आली.

सोमवारी सकाळी पालकांचे संमतीपत्र असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. सोशल डिस्टशिंगचे पालन, सॅनटायझरचा वापर व तापमानाची नोंद प्रत्येक विद्यार्थ्याची घेतली जात होती.


Photo शाळेची घंटा वाजली, असा दिला विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी प्रवेश
सर्वात लांबलेला मान्सून संपला, आता परतीचा प्रवास

शाळेसाठी नियमावली काय?

-एका बेंचवर एक विद्यार्थी

-शाळा प्रवेशासाठी पालकांची मंजुरी आवश्यक

-सर्व विद्यार्थी शाळेत येणार असतील तर एक दिवस आड शाळा

-एका दिवशी १५ ते २० विद्यार्थ्यांनाच प्रवेश

-सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक

-मास्क परिधान करणे आवश्यक

-सॅनिटायजर वापरणं गरजेचं

Related Stories

No stories found.