Photo सोमवारपासून शाळा सुरु? पाहा, कशी चालली तयारी

Photo सोमवारपासून शाळा सुरु? पाहा, कशी चालली तयारी
Published on
2 min read

नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यात महापालिका आणि जिल्हा परिषदेचा शाळा सोमवारपासून(ता.४ ऑक्टोंबर) सुरु होणार आहे. ग्रामीण भागात ५ वी ते ७ वी हे वर्ग आणि शहरात ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू होणार आहेत. ग्रामीण भागातील ८ वी ते १२ वीचे वर्ग यापूर्वीच सुरू करण्यात आले आहेत. यासाठी शिक्षण विभागाने नियमावली तयार केली आहे.

शाळांचे फोन क्रमांक, त्यांच्या परिसराचे नाव, जवळील आरोग्य केंद्रांचे संपर्क क्रमांक, विद्यर्थ्यांची संख्या ही संपूर्ण माहिती शाळा व्यवस्थापनांनी जमा करावी. आपत्कालीन काळात मदत मिळविण्यासाठी शाळा व्यवस्थापनांनीसुद्धा त्यांचे संपर्क क्रमांक सुरू ठेवावेत अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

Photo सोमवारपासून शाळा सुरु? पाहा, कशी चालली तयारी
ड्रग्स पार्टी, आठ जणांची नावे आली समोर, ५ लाखांपर्यंत होती एन्ट्री फी

विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यापूर्वी पालकांकडून संमतीपत्र घेणे आवश्यक असून, शाळा व्यवस्थापनांनी ते संबंधितांकडून घ्यावेत. तसेच प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये याचीही खबरदारी घ्यावी अशा सूचना केल्या आहेत.

प्रत्येक वर्गात एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे १५ विद्यार्थ्यी बसवावेत. विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यास अतिरिक्त वर्गात विद्यार्थ्यांना बसवावे, तेही नसल्यास सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात वर्ग घ्यावेत, अशा सूचनाही केल्या आहेत.

Photo सोमवारपासून शाळा सुरु? पाहा, कशी चालली तयारी
सर्वात लांबलेला मान्सून संपला, आता परतीचा प्रवास

लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या शिक्षक आणि कर्मचार्यांनाच विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. शाळांमध्ये गणित, विज्ञान आणि इंग्रजी हेच विषय शिक्षकांनी प्राधान्याने शिकवावेत. शाळा व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे जवळून लक्ष ठेवावे, अशाही सूचना अधिकार्यांनी केल्या आहेत.

Related Stories

No stories found.