Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याजि. प. सेवक बदली प्रक्रियेचे वेळापत्रक तयार

जि. प. सेवक बदली प्रक्रियेचे वेळापत्रक तयार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषद सेवकांच्या बदली प्रक्रिया ( ZP Employees Transfer Process ) दि.27 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने वेळापत्रक तयार केले असून, दि.27 ते 29 जुलैदरम्यान ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

- Advertisement -

करोनाच्या( Corona ) पार्श्वभूमीवर सेवकांची होणारी गर्दी ( Crowd ) टाळण्यासाठी शहरातील वाघ गुरूजी शाळेत बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून या बदल्यांची तयारी पूर्ण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, बदली प्रक्रियेसाठी निश्चित केलेल्या वेळापत्रकांवर गुरुवारी (दि.22) शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ग्रामविकास विभागाने गत आठवड्यात सेवक बदली प्रक्रियेबाबत परिपत्रक काढले. यात 10 टक्के प्रशासकीय बदल्या करण्यात याव्यात. तसेच 10 टक्के विनंती बदली प्रक्रिया राबवावी असे सांगण्यात आले आहे. 31 जुलै 2021 अखेर प्रशासकीय बदल्या कराव्यात तर, 14 ऑगस्टपर्यंत विनंती बदल्या करण्याचे निर्देश दिले आहे.

करोनाचे संकट अद्यापही कमी झालेले नसल्याने अत्यावश्यक सेवेतील आरोग्य विभाग व ग्रामविकास विभागात केवळ 5 टक्के सेवकांच्या बदल्या करण्याचे आदेश आहेत. या आदेशानंतर बदली प्रक्रिया कशी राबवायची असा प्रश्न उपस्थित झाला होता. सन 2014 च्या परिपत्रकाप्रमाणे समुपदेशन करावयाचे असल्याने सेवकांना प्रत्यक्ष बोलवावे लागणार होते. दुसरीकडे जिल्हयात कलम 144 लागू आहे. याशिवाय पालकमंत्री छगन भुजबळ यांनी देखील सार्वजिनिक गर्दीवर निर्बंंध टाकलेले आहेत. परंतु, प्रशासनाने यामार्ग काढत गर्दी होऊ नये, यासाठी एका खाजगी शाळेत ही प्रक्रीया राबविण्याचे प्रस्तावित केले आहे.

याशिवाय 27, 28 व 29 या तीन दिवसात विविध विभागातील सेवकांच्या बदली प्रक्रीयाबाबतचे वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसार, गर्दी न करता त्या-त्या विभागातील सेवकांना बोलावून सेवक बदली प्रक्रीया पार पाडण्याबाबत नियोजन सामान्य प्रशासन विभागाने तयार केले आहे. बदल्यांबाबत सामान्य प्रशासन विभागाने बदली सेवकांच्या याद्या अंतिम केल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या