बापरे! उपकंत्राटदार म्हणून काम देण्याचे आमिष दाखवत तब्बल ४७ लाखांची फसवणूक

नाशिकमधील धक्कादायक घटना
बापरे! उपकंत्राटदार म्हणून काम देण्याचे आमिष दाखवत तब्बल ४७ लाखांची फसवणूक

नाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashik

उपकंत्राटदार म्हणून काम देण्याचे आमिष दाखवत नाशिकरोडच्या एकाची ४७ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी कोर्टाच्या आदेशानुसार उपनगर पोलिस ठाण्यात (Upnagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

याप्रकरणी राजू बबन काकड (रा. प्रभा आनंद संकुल, धोंगडे मळा) असे तक्रारदाराचे नाव आहे. त्यांनी आपल्या आर्थिक फसवणूकीबाबत कोर्टात दावा दाखल केला होता.

बापरे! उपकंत्राटदार म्हणून काम देण्याचे आमिष दाखवत तब्बल ४७ लाखांची फसवणूक
तिकीट बुकिंगबाबत रेल्वे मंत्रालयानं घेतला मोठा निर्णय

कोर्टाच्या आदेशानुसार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, टेरा फार्मा सुपर स्ट्रॅक्ट एलएलपी कंपनीचे प्रतित अशित शाह, क्रितीका अशित शाह या दोघा संशयितांनी २२ ऑक्टोबर २०२१ रोजी पुण्यातील रुबी रुग्णालया शेजारील मिलियम स्टार बिल्डींगमध्ये राजीव काकड यांना टाटा कंपनीचे ५५ कोटी ५८ लाख ४७, ४५१ रुपयांचे कंत्राट भेटले आहे, असे सांगून बनावट कागदपत्र दाखवून काकड यांचा विश्वास संपादन केला.

बापरे! उपकंत्राटदार म्हणून काम देण्याचे आमिष दाखवत तब्बल ४७ लाखांची फसवणूक
'डॅडी'बाबत न्यायालयाने घेतला 'हा' मोठा निर्णय

काकड यांना उप कंत्राटदार म्हणून काम देण्यासाठी ६३ लाख ४० हजार रुपये घेतले. काही दिवसांनी त्यापैकी १६ लाख परत केले. मात्र, ४७ लाख ४० हजार रुपये परत दिले नाही. त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा पुण्यात घडल्याने तेथील बंडगार्डन पोलिस ठाण्यात वर्ग केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com