एसबीआयचा ग्राहकांना मोठा झटका

एसबीआयचा ग्राहकांना मोठा झटका

मुंबई | Mumbai

राष्ट्रीयकृत बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेटमध्ये (BPLR) ७० बेसिस पॉइंट्सने वाढ केली असून या बदलानंतर एसबीआयकडून कर्ज घेणाऱ्यांचे इएमई (EME) वाढले आहे. यापूर्वी आरबीआयने रेपो दरात (Repo Rate) १.४० टक्के वाढ केली असून हा बदल तीन वेगवेगळ्या काळात लागू करण्यात आला आहे...

बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेटमध्ये आरबीआयने (RBI) रेपो रेट ७० बेसिस पॉईंटने वाढवल्यानंतर सरकारी आणि खासगी बँका (Government and Private Banks) कर्जाच्या दरात बदल करत आहेत. त्यामुळे बँकेच्या कर्जाची परतफेड करणे महाग होत आहे. मात्र, बँकांकडून मुदत ठेवींवरील (FD) व्याजदरही वाढवले ​​जात आहेत. ७० बेसिस पॉइंट्सच्या वाढीनंतर एसबीआयच्या बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेटवर आधारित कर्जाचा व्याजदर १३.४५ टक्के झाला आहे.

एसबीआयचा ग्राहकांना मोठा झटका
टोल भरण्यावरून दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडीओ...

तसेच हे नवीन दर आजपासून (दि.१५) लागू झाले असून बीपीएलआरशी जोडलेल्या कर्जाची परतफेड आता पूर्वीपेक्षा महाग होणार आहे. या वाढीपूर्वी बीपीएलआरचा दर १२.७५ टक्के होता. यापूर्वी जून महिन्यात हा दर बदलण्यात आला होता. बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेटच्या व्याजदरात बदल करून नवीन दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भातील माहिती एसबीआयच्या (SBI) वेबसाइटवर देण्यात आली आहे.

एसबीआयचा ग्राहकांना मोठा झटका
आता 'या' स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप काम करणार नाही, जाणून घ्या कारण

दरम्यान, बँकेने बेस रेटमध्येही ७० बेसिस पॉईंटची वाढ केली असून यानंतर बेस रेट ८.७ टक्के झाला आहे. तसेच मूळ दरावर लागू होणारे नवीन दर आजपासून लागू करण्यात आले असून मूळ दर हा आधार म्हणून घेतल्यास कर्जदारांचा ईएमआयही महाग होणार आहे.

एसबीआयचा ग्राहकांना मोठा झटका
प्रकल्प राज्याबाहेर जाणे दुर्दैवी - शरद पवार
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com