SBI ने आपल्या ग्राहकांसाठी बदले हे नियम

SBI ने आपल्या ग्राहकांसाठी बदले हे नियम

नवी दिल्ली

देशातील सर्वात मोठी सार्वजनीक बँक एसबीआय (State Bank Of India) आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेने एका दिवसात खात्यातू पैसे काढण्याच्या मर्यादा वाढ केली आहे. कोरोचाच्या काळात ग्राहकांसाठी ही सुविधा केली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ही सुविधा लागू असणार आहे.

SBI ने आपल्या ग्राहकांसाठी बदले हे नियम
HSC Exam : सर्वोच्च न्यायालयात आज काय झाले ?

एसबीआयच्या (SBI) ४६ कोटी ग्राहकांना होणार आहे. एसबीआयच्या नव्या नियमांनुसार, ग्राहक एसबीआयच्या इतर कोणत्याही शाखेत जाऊन पैसे काढण्याचा फॉर्म भरुन दिवसाला २५ हजार रुपये काढता येणार आहेत. पैसे काढण्याच्या नवीन नियमांसह एसबीआयने काही अटी देखील लागू केल्या आहेत. थर्ड पार्टी विड्रॉल फॉर्मद्वारे (Withdrawal form) रोख रक्कम काढू शकणार नाही.

काय आहे सुविधा

– पैसे काढण्याच्या फॉर्मद्वारे ग्राहक एसबीआयच्या दुसऱ्या कोणत्याही शाखेत जाऊन त्यांच्या बचत खात्यातून २५ हजार रुपये काढू शकणार आहेत.

– धनादेशाद्वारे दुसऱ्या शाखेतून १ लाख रुपयांपर्यंत पैसे काढता येणार आहेत.

– थर्ड पार्टी म्हणजे ज्याला धनादेश देण्यात आला आहे. त्याला रोख पैसे काढण्याची मर्यादा ५० हजार रुपये केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com