Bad News # 'साथ जिऐंगे साथ मरेंगे' म्हणत अल्पवयीन प्रेमी युगलाची एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास घेत आत्महत्या

Bad News # 'साथ जिऐंगे साथ मरेंगे' म्हणत अल्पवयीन प्रेमी युगलाची एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास घेत  आत्महत्या

शेगांव Shegaon प्रतिनिधी

बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या आदिवासी गाव असलेल्या कहू पट्टा येथील अल्पवयीन प्रेमीयुगलाने (Minor loving couple) थानसिंग मोरे यांच्या शेतातील पळसाच्या झाडाला दोरीच्या च्या साह्याने एकत्रितपणे गळफास (hanging) घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची घटना आज दिनांक १६ एप्रिल २३ रोजी सकाळी उघडकीस आली.

कहू पट्टा येथील आदिवासी नागरिकांच्या लक्षात ही बाब येतात त्यांची तारांबळ उडाली त्यांनी याबाबत सुनगावचे पोलीस पाटील तडवी यांना माहिती दिली, पोलीस पाटील तडवी यांनी विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली व पोलीस स्टेशन जळगाव जामोद याबाबत माहिती देण्यात आली.

जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे एपीआय कैलास चौधरी, पीएसआय शिवानंद वीर, बीड जमादार शेगोकार पोलीस कॉन्स्टेबल वावगे यांनी घटनास्थळी धाव घेत सदर प्रेमीयुगलाचे मृतदेह खाली उतरून त्याचा पंचनामा केला.

सदर घटनेची तक्रार मृतक मुलाचे काका सखाराम डावर यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली. सदर प्रेमीयुगलाने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास ठाणेदार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे. (दोघे प्रेमी युगल अल्पवयीन असल्याने त्यांची नावे जाहिर केलेली नाहीत)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com