Monday, April 29, 2024
Homeजळगावसावदा एपीआय व पीएसआय यांनी लाच मगितल्या प्रकरणी अटक

सावदा एपीआय व पीएसआय यांनी लाच मगितल्या प्रकरणी अटक

सावदा,(Savada) ता.रावेर (वार्ताहर)-

अपहार प्रकरणातील आरोपींना अटक न करण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या सपोनि तसेच उपनिरिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (Anti-Corruption Department) पथकाने रंगेहात अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, शहरातील एका दाखल झालेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला अटक न करण्यासाठी सावदा पोलीस स्थानकाचे सपोनि देवीदास इंगोले (Devidas Ingole) आणि उपनिरिक्षक समाधान गायकवाड (Sub-Inspector Samadhan Gaikwad) यांनी ६० हजार रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर १५ हजार इतक्या रूपये देण्याचे ठरले. मात्र यांना ट्रॅपची भनक लागल्यावर लाच स्वीकारणे टाळले होते. या अनुषंगाने अँटी करप्शन ब्युरोतर्फे कारवाई करण्यात आली आहे. या पथकाने सापळा रचल्यानंतर सपोनि देवीदास इंगोले आणि उपनिरिक्षक समाधान गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या