गिरणा नदीला पूर; सावकीचा पूल पाण्याखाली, चणकापूरचा विसर्ग २० हजार क्युसेकपर्यंत वाढवला

गिरणा नदीला पूर; सावकीचा पूल पाण्याखाली, 
चणकापूरचा विसर्ग २० हजार क्युसेकपर्यंत वाढवला

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गिरणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात (Girna Dam water catchment area) सुरू असलेल्या पावसाने पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे चणकापूर धरणाचा जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे....

प्राप्त माहितीनुसार, चनकापूर धरणातून दुपारी १२ वाजेच्या सुमारास १९ हजार २६६ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. पुनद धरणातूनही 2 हजार 442 क्युसेक पाणी सोडले जात आहे.

दुसरीकडे ठेंगोडा बंधाऱ्यावरून 17 हजार 010 क्युसेक पाण्याचा विसर्ग गिरणा नदीपात्रात सुरु झाला आहे. पावसाचा जोर टिकून राहिल्यास दुपारी दोनवाजेनंतर पाण्याचा विसर्ग 25 हजार क्युसेक इतका वाढण्याची शक्यता आहे.

गिरणा नदीला पूर आल्यामुळे मालेगावसह उत्तर महाराष्ट्रसाठी दिलासादायक असून मालेगाववासियांनादेखील मोठा दिलासा मिळाला आहे. नदी दुथडी भरून वाहू लागल्यामुळे नदीकाठी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

सावकी पूल पाण्याखाली

लोहोणेर किंवा देवळा मार्गे सावकी खामखेडा, पिळकोस परिसराला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यामुळे विठेवाडी सावकी संपर्क तुटला आहे. सावकीकडून लोहोणेर देवळा जाणाऱ्या नागरिकांनी विंचूर प्रकाशा मार्गावरील सावकीफाटा येथून प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com