Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यापुणे विद्यापीठाने ‘या’ दिवशी होणारी परीक्षा पुढे ढकलली

पुणे विद्यापीठाने ‘या’ दिवशी होणारी परीक्षा पुढे ढकलली

पुणे |  Pune

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाकडून (SPPU) घेण्यात येणाऱ्या विविध विद्याशाखांच्या परीक्षा सध्या सुरु आहेत. या परीक्षा (Examination) दि. २७ डिसेंबर २०२२ पासून सुरु आहेत. त्यासाठी विद्यापीठाकडून वेळापत्रकाचे (Time table) नियोजन करण्यात आले होते. या वेळापत्रकानुसार दि. ३० जानेवारी रोजीही महाविद्यालयांमध्ये विविध विद्याशाखांच्या परीक्षांचे आयोजन करण्यात आहे होते.

- Advertisement -

त्या वेळापत्रकात विद्यापिठाने आता बदल करण्याचे ठरविले असून यानुसार दि. ३० जानेवारी रोजी होणारी परीक्षा आता पुढे ढकलण्यात येणार आहे. या दिवशी विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार असून त्यासाठी निवडणूक यंत्रणेने (elections) काही महाविद्यालयात मतदान केंद्र स्थापित केले आहेत.

या दिवशी परीक्षेच्या कारणास्तव मतदान (voting) प्रक्रियेत अडथला होऊ नये या बाबींचा विचार करून विद्यापिठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने दि. ३० जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलून त्या परीक्षा दि. 5 फेब्रुवारी रोजी घेण्याचे ठरविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या