Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याSave Soil : यंत्राद्वारे दहा सेकंदात मृदा परीक्षण

Save Soil : यंत्राद्वारे दहा सेकंदात मृदा परीक्षण

पुष्कर काळे ( Pushkar Kale )

पिकांसाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मृदा. मृदा निरोगी राहावी (soil should be healthy) यासाठी मृदेचा नेमका पोत बळीराजाला समजावा, यासाठी यंत्राद्वारे अवघ्या दहा सेकंदात मृदा परीक्षण ( Soil Testing ) करता येऊ शकते. या यंत्राद्वारे देशभरात विविध ठिकाणचे मातीचे परीक्षण केले आहे. यातून शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढले असून निर्यातक्षम उत्पादनात वाढ झाली आहे.

- Advertisement -

सध्या माती परीक्षणाची प्रक्रिया अगदीच वेळखाऊ आहे. मातीचा अहवाल येईपर्यंत मातीत अनेक बदल होतात, त्यामुळे अनेक शेतकरी माती परीक्षणाकडे लक्ष देत नाहीत. परिणामी दिवसेंदिवस मातीचा पोत खालावत चालला असून उत्पन्न दिवसेंदिवस घटत चालले आहेत. दुसरीकडे जमिनीच्या कसाची शास्त्रीय माहिती शेतकर्‍यांना नसल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करतात. परंतु अतिप्रमाणातील खतांमुळे जमीन नापीक होते. परिणामी उत्पन्न घटते.

भारताची वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्या प्रमाणात अन्नधान्याचे उत्पादन वाढणेही गरजेचे आहे. उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर होतो. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. हे सगळे टाळता येण्यासाठी मातीचे परीक्षण नियमित होणे आवश्यक आहे.परंतु माती परीक्षणाची वेळखाऊ पद्धत असल्यामुळे शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करतात.त्यामुळे आम्ही निर्माण केलेल्या उपकरणाच्या माध्यमातून हे सगळे अगदी सहज शक्य आहे. यामुळे अनेक शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढले असल्याचे त्यांच्याही लक्षात आले आहे.

शेतीसाठी केवळ माती परीक्षणच महत्त्वाचे नसून शेतीला दिले जाणारे पाणी, हवामान, पिकांचे पोषणद्रव्य यांचादेखील अंदाज घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी आम्ही अजून काही उत्पादनांवर काम करत आहोत. लवकरच पाणी परीक्षणाचे यंत्रदेखील आणणार असून पिकांना मिळालेले पाणी निरोगी आहे की नाही याची तपासणी त्यांच्या माध्यमातून काही सेकंदात होणार आहे.

विशेष म्हणजे, हे यंत्र शेतात अगदी सहजरीत्या नेता येत असल्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी या उपकरणाला पसंती दिली आहे. यंत्र सुरू केल्यानंतर जमीन ओली करून काही सेकंद थांबले असता मोबाईलमध्ये असलेल्या अ‍ॅपमध्ये हा अहवाल तयार होतो.

हा अहवाल घेऊन आपण तज्ज्ञांकडे गेलो तर त्यांच्याकडून काही काळातच योग्य तो सल्ला मिळतो. त्यामुळे तपासणी अहवाल मोबाईलवर अवघ्या दहा सेकंदात मिळतो. बॅटरीवर चालणारे हे उपकरण वापरायला अगदी सोपे असून कुठेही सहज घेऊन जाता येते. त्यामुळे सध्याची क्लिष्ट असणारी माती परीक्षण प्रक्रिया सोपी होत आहे. या उपकरणांच्या माध्यमातून आठ घटकांची माहिती मिळते. यामध्ये अजून घटक मिळण्याचे कामदेखील सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या