Save Soil : येणार्‍या पिढ्यांसाठी माती वाचवा

Save Soil : येणार्‍या पिढ्यांसाठी माती वाचवा

मंगेश भास्कर, मृदातज्ज्ञ (Mangesh Bhaskar, Soil Specialist)

माती हा शेतीचा पाया (Soil is the foundation of agriculture)आहे; आपला देश सुजलाम् सुफलाम् आहे. त्याचा पाया, त्याचे सर्वस्व माती आहे. माती सुपीक असेल तर आणि तरच आपला देश समृद्ध होऊ शकतो. येणार्‍या पिढ्या सशक्त करायच्या असतील तर या मातीची काळजी घेणे आवश्यक आहे. जर मातीची काळजी घेतली गेली नाही तर मातीचा कस कमी होत जाईल आणि ते मानवाला अतिशय हानिकारक ठरू शकते.

माती आणि मानवी आरोग्य यांचा संबंध काय आहे, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. मानवाला जगण्यासाठी फक्त अन्न नाही तर त्या अन्नातील खनिजे महत्त्वाची आहेत. ही खनिजे मानवाला अन्नातून मिळतात आणि अन्नधान्य या शेतातून शेतातल्या मातीतून येते.

या मातीमध्ये सूक्ष्मजीव, पाणी आणि सेंद्रीय खते यांचे समतोल प्रमाण असेल तर मातीत कसदारपणा येतो आणि याच कसदारपणामुळे आपल्याला ती खनिजे प्राप्त होतात. समतोलतेतून तयार झालेले अन्न माणूस खातो आणि खाल्लेले अन्न आणि त्यातून तयार होणारे सशक्त शरीर याचा पाया हा माती आहे, असे यातून लक्षात येते. जुनी पिढी नेहमी सांगते की, आम्ही दीर्घायू आहोत, कारण आम्ही सर्व आरोग्याला उपयुक्त असेच खातो. चांगले अन्न आणि व्यायाम यातून कसदार माणूस तयार होतो. हाच कसदार माणूस रोगप्रतिकारशक्ती पूरक असलेला आहे.

माती वाचवण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांनी काय करायला हवे, असेही लोक विचारतात. ग्रामीण भागातील शेतकरीवर्गाने उत्पादन पद्धतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. मी माझी शेती ही टिकवण्यसाठी योग्य काम करत आहे का? असा प्रश्न स्वत:ला विचारणे आवश्यक आहे. सध्या मोनो क्रोप पद्धती सुरू झाली आहे. वर्षभर एकच पीक घेतले जात असल्याने किडे, त्यांच्यासाठी असलेली खते ही एक प्रकारचीच आहेत. त्यामुळे कुठेतरी ही पद्धत हानिकारक ठरत आहे. त्यापेक्षा त्यांनी बहुपीक पद्धत वापरली पाहिजे.

शेताच्या बाजूला पक्षी येऊन बसतील अशी झाडे लावली पाहिजे, शेतीला थोडीशी विश्रांती देणेदेखील आवश्यक आहे. ग्रामीण भागातील लोकांनी शेती करण्याची पद्धत बदलली पाहिजे. शहरी भागातील लोकांनी विचार आणि खाण्याच्या सवयी बदलल्या पाहिजे. जे आपण खातो त्यात सेंद्रीय पद्धत योग्य पद्धतीने पाहिजे, शेतकर्‍यांच्या उत्पादनाच्या पद्धती बदलण्यासाठी ग्राहक बदलले पाहिजे.

एकदा ग्राहकाच्या सवयी बदलल्या तर आपल्याला शेतकर्‍याची पद्धत बदलणे अवघड होणार नाही. ही साखळी समतोल होणे आवश्यक आहे. एकंदरीतच शहरी भागातील लोकांच्या अन्न ग्रहण करण्याच्या सवयी बदलल्या पाहिजे आणि शेतकर्‍यांनी वर्षानुवर्षे आखून घेतलेली चौकटदेखील बदलायला पाहिजे. खरेतर सद्गुरू यांची ही मोहीम अतिशय योग्य आहे. सध्या मातीला आपण आई मानतो आणि त्या आईला वाचवण्यासाठी कार्य ते करत आहेत. आपण या काळ्या आईला खर्‍या अर्थाने आई मानले पाहिजे; ही आई वाचवली पाहिजे म्हणजे पुढच्या पिढ्या यावर कार्य करतील.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com