Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या‘देशदूत-मविप्र’ आयोजित ‘माती वाचवा’ कार्यक्रम; विविध कलाविष्कार रसिकांचे लक्ष वेधणार

‘देशदूत-मविप्र’ आयोजित ‘माती वाचवा’ कार्यक्रम; विविध कलाविष्कार रसिकांचे लक्ष वेधणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

श्री.सद्गुरू ( Shri Sadguru ) अर्थात जग्गी वासुदेव ( Jaggi Vasudev ) यांचे आज नाशिकमध्ये आगमन होत आहे. त्यांना कलाविष्काराच्या माध्यमातून नाशिकच्या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी नाशिकच्या मातीतील कलाकार सज्ज झाले आहेत.

- Advertisement -

या कलाविष्कारात नाशिक ढोल, नृत्यामधून मृदा वंदना, आदिवासी नृत्य तसेच लेझीम पथक आणि इतर वाद्यांचा समावेश असणार आहे. यासाठी दंडकारण्यनगरी ( Dandkarnya Nagari )सजली आहे. तर दुसरीकडे सुमारे 100 कलाकार सद्गुरूंसमोर आपली कला सादर करणार आहेत.

या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात ढोल-ताशांच्या गजरात होईल. गीतकार मिलिंद गांधी लिखित मृदावंदनाचे सादरीकरण करण्यात येईल. फणसवाडा येथील मंडळाचे आदिवासी नृत्य, सृष्टीनाद, मल्हार दर्शन, साऊंड ऑफ ईशा आणि ईशा संस्कृती अशी भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.

सद्गुरूंचे स्वागत मखमलाबादच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाच्या लेझीम पथकाने होईल. या भव्यदिव्य सोहळ्यात पंडित डॉ. अविराज तायडे यांच्यासह ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना रेखा नाडगौडा यांच्यासह कथ्थक नृत्यांगना अदिती पानसे, सुमुखी अथनी, दीपा बक्षी, भरतनाट्यम नृत्यांगना सोनाली करंदीकर आदींसह विद्यार्थ्यांचा सहभाग असेल. तबलावादनासाठी तबलावादक नितीन पवार आणि नितीन वारे यांच्यासह त्यांच्या विद्यार्थ्यांचा समावेश असेल. बासरी-मोहन उपासनी, सिंथेसायझर-अनिल धुमाळ, बेस गिटार-पार्थ शर्मा, ऑक्टोपॅड-अभिजित शर्मा आणि गीटार-नरेंद्र पुली आदी कलाकारांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या