‘देशदूत-मविप्र’ आयोजित ‘माती वाचवा’ कार्यक्रम; श्री. सद्गुरुंचा आज नाशिककरांशी संंवाद

‘देशदूत-मविप्र’ आयोजित ‘माती वाचवा’ कार्यक्रम; श्री. सद्गुरुंचा आज नाशिककरांशी संंवाद

स्वागतासाठी सजली दंडकारण्यनगरी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

‘देशदूत’ आणि मराठा विद्या प्रसारक संस्था ( Deshdoot & Maratha Vidya Prasarak Sanstha ) आयोजित श्री.सद्गुरू ( Shri Sadguru ) यांच्या ‘माती वाचवा’ ( Save Soil ) कार्यक्रमासाठी दंडकारण्यनगरी ( Dandkaranya Nagari ) (केटीएचएच महाविद्यालय मैदान) सज्ज झाले आहे. कार्यक्रम साडेचार वाजता सुरू होईल. कार्यक्रमाला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या कार्यक्रमाच्या नोंदणीसाठी लिंक आणि क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. कार्यक्रमस्थळी येणार्‍यांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात आले असून पार्किंगसाठी जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. नाशिकचे कलाकार ‘मृदा वंदना’ सादर करणार आहेत.

स्वागतासाठी सजली दंडकारण्यनगरी

‘माती वाचवा’ अभियान (सेव्ह सॉईल) हाती घेऊन अनेक देशांचा प्रवास करून भारतात आलेले ईशा फाऊंडेशनचे ( ( Ishad Foundation )) संस्थापक श्री. सद्गुरू अर्थात जग्गी वासुदेव ( Shri Sadguru / Jaggi Vasudev )यांचे आज पुण्यनगरी नाशिक येथे आगमन होत आहे. ‘माती वाचवा’ अभियानांतर्गत जनजागृती करण्यासाठी श्री. सद्गुरू आज (दि.11) सायंकाळी नाशिककरांंशी संवाद सधणार आहेत.

‘देशदूत’ आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येथील केटीएचएम महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर सायंकाळी 4.30 वाजता हा भव्य-दिव्य सोहळा होत आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक दीपक बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, अ‍ॅग्री सर्च (इंडिया) प्रा. लि., चंदुकाका सराफ अ‍ॅण्ड सन्स प्रा.लि. असून रेडिओ विश्वास रेडिओ पार्टनर आहेत.

प्रगतीची शिखरे गाठताना मानवाने स्वार्थासाठी पर्यावरणाची अपरिमित हानी केली. त्यामुळे झालेल्या प्रदूषणामुळे मानवाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. माती प्रदूषणाच्या धोक्याचाही यात समावेश आहे. 'माती वाचवा' अभियानाअंतर्गत श्री. सद्गुरु यांनी 100 दिवसांत 27 देशांना भेटी दिल्या आहेत. ही त्यांची सोलो बाईक राईड आहे. आज नाशिकला येत आहेत. जगातील 3.5 अब्ज लोकांचा पाठिंबा मिळवून (जगात मतदानाचा अधिकार असणार्‍या 60 टक्के लोकसंख्येपेक्षा जास्त) जगभरातील सरकारांना मातीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि मातीचा र्‍हास थांबवण्यासाठी व त्याकरता धोरणात्मक बदल करण्यासाठी प्रेरित करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.

जागतिक नेते, प्रभावशाली व्यक्ती, कलाकार, शेतकरी, तज्ञ, आध्यात्मिक नेते, सामाजिक संस्था आणि सामान्य जनता मातीसोबत मानवतेचा संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी या अभियानाला मोठा पाठिंबा देत आहेत. 'माती वाचवा' अभियानात श्री.सद्गुरु यांनी 30,000 कि.मी.चा प्रवास केला. यादरम्यान त्यांनी वेगवेगळ्या देशांना भेटी देऊन ङ्गमाती वाचवाफ हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवला आहे. 21 मार्चला लंडनमध्ये सुरु झालेल्या या यात्रेचा समारोप जूनअखेर कावेरी नदीच्या खोर्‍यात होणार आहे.

जागतिक अन्न संघटना आणि युनायटेड नेशन्स कनवेन्शन टू कॉम्बॅट डेजर्टिफिकेशन यांच्या माध्यमातून हे अभियान होत आहे. 2050 सालापर्यंत जगभरातील सुमारे 90 टक्के मातीचा र्‍हास होण्याचा अंदाज संबंधित संस्थांच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. माती नष्ट झाल्यामुळे जगभरात अभूतपूर्व पर्यावरणीय, आर्थिक आणि सामाजिक आपत्ती संभवतात. तीव्र स्वरुपाचे हवामान बदल, अन्न आणि पाण्याची जागतिक टंचाई, भीषण नागरी संघर्ष, प्रत्येक राष्ट्राची सुरक्षा आणि सांस्कृतिक रचना धोक्यात आणणार्‍या स्थलांतराचा त्यात समावेश आहे. मातीचे संवर्धन केल्यास हे प्रश्न सुटणार आहेत.

'माती वाचवा' मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट जगातील सर्व राष्ट्रांना तातडीच्या धोरणात्मक सुधारणांद्वारे शेतजमिनीत किमान 3-6 टक्के सेंद्रिय सामग्री अनिवार्य करण्यासाठी प्रेरित करणे आहे. त्याशिवाय माती नामशेष होण्याचा धोका असल्याचा इशारा मृदा शास्त्रज्ञांनी दिला आहे. भारतात शेतमातीच्या वरच्या थरात सेंद्रिय सामग्री सरासरी 0.68 टक्के असल्याचा अंदाज आहे. देशातील सुमारे 30 टक्के सुपीक माती आधीच नापीक बनली आहे. जागतिक स्तरावर सुमारे 25 टक्के सुपीक जमीन ओसाड झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्याच्या मातीच्या र्‍हासाच्या दरानुसार 2050 पर्यंत पृथ्वीचा 90 टक्के भाग वाळवंटात बदलू शकतो, असा इशारा युनायटेड नेशन्सने दिला आहे.

‘माती वाचवा’ ही माती आणि धरती वाचवण्यासाठी एक सजग दृष्टीकोनाची प्रेरणा देणारी जागतिक चळवळ आहे. त्याबाबत श्री सद्गुरु उपस्थितांना माहिती देणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दैनिक देशदूत परिवार, मराठा विद्या प्रसारक समाज संस्था, ईशा फौंडेशन आणि असंख्य सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत. नाशिक येथे प्रथमच होत असलेल्या या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा नाशिककरांंनी लाभ घ्यावा, असे आवाहन संंयोजकांनी केले आहे.

पोलीस यंत्रणा सज्ज

ईशा फाऊंडेशनचे संस्थापक श्री. सद्गुरू यांच्या नाशिक येथील माती वाचवा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांची यंत्रणा सज्ज झाली आहे. दुपारी तीन ते रात्री आठपर्यंत सदगुरू यांचा कार्यक्रम निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

केटीएचएम महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात होणार्‍या या कार्यक्रमास सुमारे 20 हजारांवर नागरिक उपस्थित राहतील, असा पोलिसांंचा अंंदाज आहे. त्यात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींपासून तसेच लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

श्री. सदगुरू यांचे नाशिकला आगमन झाल्यानंंतर सुरुवातील ते हॉटेल रेडडिसन ब्ल्यूमध्ये उतरणार आहेत. कार्यक्रमस्थळी सद्गुरू त्यांच्या दुचाकीवरूनच येणार आहेत. हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथून निघाल्यानंतर ते पाथर्डी फाटा, बूब पेट्रोल पंपसमोरून उड्डाणपुलावरुन गोविंदनगर येथे उतरतील. मुंबई नाका, सीबीएस, अशोक स्तंंभ मार्गे केटीएचएम महाविद्यालय मार्गे कार्यक्रम स्थळी येतील. या कार्यक्रमात ध्वनीक्षेपकास पोलिसांनी अनुमती दिली आहे. सर्व कार्यक्रम शांंततेत पार पडण्यासाठी अटी शर्तीचे पालन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com