Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या‘देशदूत-मविप्र’ आयोजित ‘माती वाचवा’ कार्यक्रम; श्रोत्यांच्या मदतीसाठी पाचशे स्वयंसेवक

‘देशदूत-मविप्र’ आयोजित ‘माती वाचवा’ कार्यक्रम; श्रोत्यांच्या मदतीसाठी पाचशे स्वयंसेवक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

या कार्यक्रमाला येणार्‍या नाशिककरांच्या मदतीसाठी स्वयंसेवकांची मोठी फळी सज्ज असेल. श्रोत्यांची वाहने लावण्यासाठी विविध टप्पे करण्यात आले आहेत. दुचाकी असो की चारचाकी त्याचे पार्किंग( Parking) करण्यासाठी स्वयंसेवक (volunteers)आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. दंडकारण्यात ठिकठिकाणी माहिती केंद्र उभारले आहेत.

- Advertisement -

डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर ( Dongare vastigriha Ground ) दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे पार्किंग आहे. तिथे स्वयंसेवकांची टीम-ए आपल्याला मार्गदर्शन करेल. इथे एक माहिती केंद्र उभारण्यात आले आहे. डोंगरे मैदान ते मॅरेथॉन चौक यादरम्यान रस्त्याच्या बाजूला उभे राहत पायी चालणार्‍यांना स्वयंसेवक मार्गदर्शन करतील. मॅरेथॉन चौकातदेखील एक माहिती केंद्र आहे. चौक ते पूर्ण रस्ता हा टीम-बीकडे असणार आहे.

टीम-सी ही केटीएचएम महाविद्यालयाच्या मागच्या प्रवेशद्वारापासून ते अनेक्स परिसरात करण्यात आलेल्या पार्किंगपर्यंत आहे. या ठिकाणी येणार्‍या नागरिकांना कार्यक्रमस्थळ कुठे आहे याबाबत माहिती दिली जाणार आहे. तसेच टीम-डी ही महाविद्यालयाची मागची पार्किंग असणार आहे. या ठिकाणी एक माहिती केंद्र उभारण्यात आले आहे.

या ठिकाणी प्रवेशद्वार तयार केले आहे. येथे असलेले स्वयंसेवक नोंदणी केलेले क्यूआर कोड तपासतील आणि श्रोत्यांना कार्यक्रमस्थळी प्रवेश देतील. टीम-इ ही पूर्णपणे मार्गक्रमण कसे करावे याबाबत मार्गदर्शन करणार आहे तर टीम-एफ ही केटीएचएम मुख्य प्रवेशद्वारापासून ते जिमखाना प्रवेशद्वारापर्यंत असेल. या टीमच्या मध्ये एक माहिती केंद्र असणार आहे. टीम-जी ही नंदिनी अशी नोंदणी असलेल्या पासधारकांसाठीच असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेले स्वयंसेवक पास बघूनच वाहनाला प्रवेश देणार आहेत.

टीम-एच ही पूर्णपणे चारचाकी पार्किंग आणि नंदिनी प्रवेशद्वार या ठिकाणी कार्यरत आहे. येथे माहिती केंद्र असून याच ठिकाणी नंदिनी नोंदणी असलेल्यांना प्रवेश मिळणार आहे. आपल्याकडील कोड हा नंदिनी असेल तरच स्वयंसेवक आपल्याला प्रवेश देणार आहेत. जर त्यांनी प्रवेश नाकारला तर लोकांनी माहिती केंद्राकडे संपर्क साधावा. टीम-आय ही अतिसंवेदनशील भागात कार्यरत असेल. या ठिकाणाहून सद्गुरू यांचे आगमन होणार आहे. या रस्त्यादरम्यान स्वयंसेवक सद्गुरू यांना मानवंदना देणार आहेत. टीम-जे ही प्रेक्षकांच्या आसनव्यवस्थेच्या सुरक्षेसाठी असणार आहे. के या टीमकडे आसनव्यवस्थेकडे लक्ष देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. टीम-एल ही एनसीसीच्या विद्यार्थ्यांची आहे. ते सद्गुरू यांना मानवंदना देतील. टीम-एम ही सद्गुरू यांचा स्टेज आणि त्याच्या मागची जागा सांभाळेल.

यांची मिळाली साथ : स्वयंसेवकांमध्ये शहरातील केटीएचएम महाविद्यालय, देवळाली कॅम्प महाविद्यालय, ओझर मिग महाविद्यालय यांचे एनसीसी कॅडेट्स तर सिडको, मखमलाबाद, विधी महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, केटीएचएम महाविद्यालय यांचे एनएसएसचे विद्यार्थी आणि गरूडझेप, अश्वमेध आणि युनिव्हर्सल अ‍ॅकेडमीचे विद्यार्थी यांचा समावेश आहे.

बोटक्लब इमारतीत मुख्य वैद्यकीय कक्ष

नाशिककर मैदानावर आल्यानंतर त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. बोटक्लब बिल्डिंगमध्ये मुख्य वैद्यकीय कक्ष उभारण्यात असून दोन तज्ज्ञ डॉक्टर,पॅरामेडिकल स्टाफही असेल. तसेच मैदानालगत असलेल्या नंदिनी प्रवेशद्वारावर डॉक्टर्सच्या उपस्थितीत मेडिकल व्हॅन सज्ज असेल. तर दुसरी मेडिकल व्हॅन रावसाहेब थोरात हॉललगत उपलब्ध राहणार आहे. मैदानावर उभारण्यात आलेल्या सहा इन्फर्मेशन सेंटर येथे तातडीचे उपचार उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येकी दोन मेडिकल बॉय उपस्थित राहणार आहेत.

सोशल मीडियावर ‘माती वाचवा’ व्हायरल

जमिनीप्रमाणेच तेथील मातीही तितकीच महत्त्वाची आहे. ‘माती वाचवा’ हा कार्यक्रम संपूर्ण नाशिककरांसाठी चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनदेखील या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याठी दैनिक ‘देशदूत’नेhttp://savesoil.deshdoot.live/ ही एक रजिस्ट्रेशन लिंक तयार केली असून या लिंकवर सर्व नागरिकांनी व्यवस्थित माहिती भरून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच क्यूआर कोडद्वारेदेखील रजिस्ट्रेशन केले जात आहे.

फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप, इन्स्टाग्राम, ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनदेखील या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. फेसबुक स्टोरीच्या माध्यमातून शेतकर्‍यांमध्ये माती वाचवण्यासाठी जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेतीकडे कसे वळावे याबद्दलदेखील माहिती दिली जात आहे.

दररोज मातीशी संबंधित तज्ज्ञ लोकांशी संवाद साधून माती वाचवण्यासाठी काय करावे? माती परीक्षण कसे करावे? जमिनीची सुपीकता कशी टिकवून ठेवावी? याविषयी ‘देशदूत’च्या यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओ तयार करून ते व्हॉटस्अ‍ॅपद्वारे शेअर केले जात आहेत. दैनिक ‘देशदूत’च्या इन्स्टाग्राम पेजवर कधी लाईव्हच्या माध्यमातून तर कधी स्टोरीच्या माध्यमातून पाच ते सहा मिनिटांचा व्हिडिओ बनवून तो अपलोड करून युजर्सचे लक्ष वेधले जात आहे. याशिवाय ‘देशदूत’च्या ट्विटर अकाऊंटवर या कार्यक्रमाचे पोस्टर, सदगुरूंचे व्हिडिओ, मातीशी संबंधित व्हिडिओ प्रसिद्ध केले जात आहेत.

प्रवेश व्यवस्था

गोदावरी प्रवेशद्वार क्रमांक 1 : रावसाहेब थोरात सभागृहासमोर

गोदावरी गेट क्रमांक 2 : केटीएचएम महाविद्यालय मेन गेट

व्हीआयपी गेट : सरकारवाडा पोलीस स्टेशन समोरील गेट

व्हीव्हीआयपी गेट : पोलिस पेट्रोल पंपासमोरील गेट

पार्किंग व्यवस्था

पार्किंग ए– डोंगरे मैदान (दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी)

पार्किंग – बी रावसाहेब थोरात सभागृहाबाजूचे मैदान (फक्त चारचाकी वाहने)

पार्किंग – सी आणि डी

केटीएचएम महाविद्यालयातील अनेक्स बिल्डिंग आणि मागील पार्किंग (फक्त दुचाकी वाहनांसाठी)

पार्किंग – इ आणि एफ

मराठा हायस्कूल समोरील पार्किंगचे मैदान ( फक्त नंदिनी नोंदणी झालेल्यांसाठी)

पार्किंग – जी महर्षी शिंदे अध्यापक विद्यालयासमोरील पार्किंग (फक्त व्हीव्हीआयपींसाठी)

- Advertisment -

ताज्या बातम्या