Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या'माती वाचवा' अभियानामुळे मातीविषयी जनजागृती होण्यास मदत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘माती वाचवा’ अभियानामुळे मातीविषयी जनजागृती होण्यास मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

ईशा फाऊंडेशनचे संस्थापक श्री सदगुरू (founder of Isha Foundation Shri Sadguru )अर्थात जग्गी वासुदेव ( Jaggi Vasudev ) यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन ‘माती वाचवा’ या आपल्या जागतिक मोहिमेची माहिती ( Save Soil Campaign Information) त्यांनी ठाकरे यांना यावेळी दिली.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या मोहिमेला शुभेच्छा देताना पर्यावरण संवर्धनासाठी राज्यात सुरू असलेल्या विविध उपक्रमांविषयाही सांगितले.मातीची गुणवत्ता तसेच संवर्धन करण्यासाठी सुरू असलेल्या या मोहिमेला महाराष्ट्राचा पाठिंबा असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी देखील सदगुरु जग्गी यांच्याकडून मोहिमेदरम्यान आलेले अनुभव जाणून घेतले तसेच पर्यावरण संवर्धनासाठी राज्यात व्यापक स्तरावर काम सुरू आहे असे सांगितले.

या भेटीच्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, राघवेंद्र शास्त्री आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.

मातीचा होणारा ऱ्हास लक्षात घेता त्याच्या संवर्धनासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी सदगुरू जग्गी वासुदेव यांनी ही मोहीम सुरू केली असून आत्तापर्यंत २७ देशांमधून २५ हजार किमीची यात्रा त्यांनी पूर्ण केली असून देशातल्या पाच राज्यांतून फिरत ते महाराष्ट्रात दाखल झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या