सावाना निवडणूक : ग्रंथालय भूषणची सत्ता

सावाना निवडणूक :  ग्रंथालय भूषणची सत्ता

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या 2022-27 निवडणूकीत ( Sarvjanik Vachnalya Nashik )मतमोजणीच्या दुसर्‍या दिवशी प्रा. दिलीप फडके यांच्या नेतृत्वाखालील ग्रंथालय भूषण पॅनलने वर्चस्व राखले आहे.

कार्यकारिणी सदस्यांच्या मतमोजणीच्या अंतिम फेरीत ग्रंथालय भूषणचे 12 उमेदवार तर वसंतराव खैरनार यांच्या नेतृत्वाखालील ग्रंथमित्र पॅनलचे 3 उमेदवार निवडून आले. प्रा. फडके यांनी सर्व सभासदांचे तसेच निवडणूक प्रक्रियेत कार्यरत असणार्‍या सर्वांचे आभार मानत असेच सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले.

रविवारी 6 हजार 189 पैकी 3 हजार 905 सभासदांनी मतदान केले होते. काल अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची मतमोजणी झाली असता त्यात ग्रंथालय भूषणच्या तीनही उमेदवारांनी बाजी मारली. आज (दि.10) होत असलेल्या कार्यकारिणी सदस्यांच्या मतमोजणीमध्ये अंतिम फेरीअखेर ग्रंथालयभूषणच्या 12 उमेदवारांनी मुसंडी मारली असून ग्रंथमित्र पॅनलच्या 3 उमेदवारांनी विजय प्राप्त केला.

विजयी उमेदवार

ग्रंथालय भूषण

संजय करंजकर 1986

प्रेरणा बेळे 1946

जयेश बर्वे 1863

जयप्रकाश जातेगावकर 1826

अ‍ॅड अभिजित बगदे 1790

देवदत्त जोशी 1721

सुरेश गायधनी 1721

डॉ.धर्माजी बोडके 1664

गिरीश नातू 1623

सोमनाथ मुठाळ 1594

मंगेश मालपाठक 1563

उदयकुमार मुंगी 1546

ग्रंथ मित्र

प्रशांत जुन्नरे 1561

श्रीकांत बेणी 1515

भानुदास शौचे 1503

Related Stories

No stories found.