
नाशिक | Nashik
नाशिकच्या बहुचर्चित सार्वजनिक वाचनालयाची (Sarvajanik vachnalay nashik) आज मतमोजणी (Vote Counting) सकाळपासून सुरु होती. पहिल्या फेरीअखेर आघाडी घेतलेल्या ग्रंथमित्रच्या वसंत खैरनार (Vasant Khairnar) हे दुसऱ्या फेरीत पिछाडीवर गेले. यामुळे ग्रंथालय भूषणचे दिलीप फडके (Granthalay bhushan dilip phadake) यांचा विजय झाला आहे...
अवघ्या ७३ मतांनी फडके यांचा विजय झाला आहे. ग्रंथालय भूषणच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. अध्यक्षपदासाठी पहिल्या फेरीअखेर 3 हजार 45 मतांची मोजणी झाली होती. यात 20 मते बाद झाली होती.
तर ग्रंथमित्र पॅनेलचे उमेदवार वसंत खैरनार (Vasant Khairnar) यांना 1 हजार 575 मते मिळाली होती. तर ग्रंथालय भूषण पॅनेलचे उमेदवार दिलीप फडके (Dilip Phadake) यांना 1 हजार 450 मते मिळाली होती.
पहिल्या फेरीअखेर तब्बल १२५ मतांची आघाडी घेलेल्या वसंत खैरनार (Vasant Khairnar) यांना दुसऱ्या फेरीत फटका बसला. तर ग्रंथालय भूषणच्या दिलीप फडके यांनी मुसंडी मारत विजयाला गवसणी घातली.
प्रतिनिधीकडून प्राप्त माहितीनुसार, 1 हजार 977 मते ग्रंथालय भूषणचे अध्यक्षपदाचे उमेदवार दिलीप फडके (Dilip Phadake) यांना मिळाली आहे. तर ग्रंथमित्रचे वसंत खैरनार (Vasant Khairnar) यांना १ हजार ९०४ मते मिळाली आहेत.