Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यासावाना : मतमोजणीस प्रारंभ; इथे पाहा निकाल

सावाना : मतमोजणीस प्रारंभ; इथे पाहा निकाल

नाशिक | प्रतिनिधी Nashik

बहुचर्चित सार्वजनिक वाचनालयाच्या मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. सुरुवातीला अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या मतांची मोजणी होत आहे. लवकरच कल हाती येण्यास सुरुवात होणार आहे.

- Advertisement -

एकूण ६३.१८ टक्के मतदान सावानाच्या निवडणुकीत झाले आहे. आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास मतमोजणीस प्रारंभ झाला. किरकोळ वाद वगळता मतमोजणी सुरळीत सुरु आहे. मतमोजणीस्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

एकूण 6 हजार 189 आजीव सभासदांपैकी 3 हजार 904 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. आज सोमवारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तर मंगळवारी कार्यकारिणी मंडळाची मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहे.

मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवारांसह कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे. आज दिवसभरात अध्यक्ष उपाध्यक्ष निवड होईल. त्यांनतर सदस्यांच्या मतमोजणीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या