
पुणे | Pune
पुणे सेशन कोर्टात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे. याआधी राहुल गांधी यांना एका मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झाली आहे....
या शिक्षेमुळे राहुल गांधी यांना आपली खासदारकी गमवावी लागली आहे. आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राहुल गांधी यांनी इंग्लंडमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींवर मानहानीचा खटला दाखल केला आहे.
सात्यकी सावरकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, माझे आजोबा, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात केलेल्या खोट्या आरोपांमुळे त्यांची बदनामी झाली आहे. त्यामुळेच मी राहुल गांधींच्या विरोधात फौजदारी मानहानीची खटला दाखल केला आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.