...तर अपक्षच; मतदानानंतर सत्यजित तांबेंची पहिली प्रतिक्रिया

...तर अपक्षच; मतदानानंतर सत्यजित तांबेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai

राज्यात आज विधानपरिषदेच्या (Legislative Council) शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान (Voting) होत असून सगळीकडे मतदारांचा (Voters) उत्साह पाहायला मिळत आहे. यामध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाचाही समावेश असून याठिकाणी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात सरळ लढत होत असल्याचे चित्र आहे...

आज माविआच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी धुळे शहरातील (Dhule city) जिल्हा परिषदेच्या एका शाळेवर जाऊन मतदान केले. तर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर तांबेंनी माध्यमांशी संवाद साधत मोठे वक्तव्य केले आहे.

...तर अपक्षच; मतदानानंतर सत्यजित तांबेंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक पदवीधर निवडणूक : शुभांगी पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क

यावेळी तांबे म्हणाले की, नाशिक पदवीधर (Nashik Graduate Constituency) मतदारसंघातील लोकांचे प्रेम बघून मन भरून येत आहे. तसेच हा मतदारसंघ अतिशय मोठा मतदारसंघ असून यामध्ये ५४ तालुक्यांचा आहे. तर चार हजारपेक्षा जास्त गावांचा या मतदारसंघात समावेश आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्र, खानदेशसह इतर भागातून लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लोकांच्या ऋणात राहणे पसंत करून येणाऱ्या काळामध्ये याठिकाणच्या लोकांचा विश्वास सार्थ करण्याचे काम करेल, असे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, मी अपक्ष उमेदवार असून अपक्षच राहील. याच्यापेक्षा जास्त कुठलेही राजकीय भाष्य आजच्या तारखेला करणार नाही. लवकरच जे मागचे दहा पंधरा दिवसांमध्ये राजकारण झालं. ज्याच्यातून परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. याच्यावर जे अर्धसत्य ठेवून ज्या पद्धतीने एकच बाजू मांडली गेली. त्यामुळेच मुद्दाम कुठली प्रतिक्रिया दिली नाही. कारण शब्दाने शब्द वाढू नये आपण ज्या पक्षांमध्ये आयुष्यभर राहिलो. त्या पक्षाला अजून लोकांसमोर वाईट करू नये म्हणून खरं बोललो नाही. वेळ आल्यावर या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणार असल्याचे तांबेंनी म्हटले.

...तर अपक्षच; मतदानानंतर सत्यजित तांबेंची पहिली प्रतिक्रिया
मुख्यमंत्र्यांचा शासकीय दौरा अचानक रद्द; 'हे' आहे कारण

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com