सत्यजित तांबे यांचे सर्व कार्यकर्त्यांना आवाहन; ‘या’ कारणास्तव विजयोत्सव नाही

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आज विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची मत मोजणी सुरु आहे. दरम्यान अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे तिसऱ्या फेरी नंतर आघाडीवर आहेत.

विजयाच्या आपण अगदी जवळ आहोत,पण विजयोत्सव साजरा करणार नाही, माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय, त्यामुळे कोणताही आनंदोत्सव नाही.सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा.मी ३ ते ७ फेब्रुवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार आहे, त्यामुळे कोणतीही घाई करु नये असे आवाहन सत्यजित तांबे यांचे कडून करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *