नाशिक पदवीधर निवडणुकीत मोठा ट्वीस्ट; सत्यजित तांबेंनी भरला अपक्ष अर्ज

नाशिक पदवीधर निवडणुकीत मोठा ट्वीस्ट; सत्यजित तांबेंनी भरला अपक्ष अर्ज

नाशिक | Nashik

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता (Nashik Graduate Constituency Election) अर्ज भरण्यासाठी आज अखेरचा दिवस असून अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत.

महाविकासआघाडीने नाशिक पदवीधरसाठी डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र,डॉ. तांबे यांनी अखेरच्या क्षणी निवडणूकीतून माघार घेत पुत्र सत्यजित तांबे यांचा अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.त्यामुळे नाशिक पदवीधर निवडणुकीत मोठा ट्वीस्ट निर्माण झाला आहे.

यावेळी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना डॉ. तांबे म्हणाले की, सत्यजीत तांबे राज्यात जे तरुण मुलं नेतृत्व करत आहेत त्यात एक दूरदृष्टी असलेलं युवा नेतृत्व आहे. त्यांना वेगवेगळ्या विषयांचं सखोल ज्ञान आहे. त्यामुळे या निवडणुकीत हे नेतृत्व द्यावं असं आमचं ठरलं. त्यामुळे आम्ही सत्यजीत तांबे यांचा अर्ज भरला आहे. हा अर्ज महाविकासआघाडीच्या वतीने भरला भरल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, शेवटच्या क्षणापर्यंत विचार सुरू असतात. त्यामुळे माझ्या नावाची घोषणा झालेली असतानाही सत्यजीत तांबे यांचा अर्ज दाखल केला. सत्यजीत तांबेंनी दोन अर्ज भरले आहेत. एबी फॉर्म माझ्या नावाने आला होता. त्यामुळे थोड्या तांत्रिक अडचणी आहेत. परंतु या निवडणुकीत निवडणूक चिन्ह नसतं. त्यामुळे सत्यजीत या निवडणुकीत महाविकासआघाडीचे उमदेवार म्हणून उभे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, दुसरीकडे भाजपने (BJP) आपला उमेदवार जाहीर केलेला नसून भाजप सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच भाजपने पाठिंबा द्यावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com