सेमीकंडक्टर उद्योगासाठी नाशिकची निवड करा

तांबे यांचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र
सेमीकंडक्टर उद्योगासाठी नाशिकची निवड करा

मुंबई :

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे (satyajeet tambe)यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिलं आहे. सेमीकंडक्टर (semiconductor)फॅबसाठी नाशिकची (nashik)निवड करा, अशी मागणी त्यांनी पत्राच्या माध्यमातून वाणिज्य मंत्री पियुष गोयल (Cabinet Minister Piyush Goyal)यांच्यांकडे केली आहे.

सेमीकंडक्टर उद्योगासाठी नाशिकची निवड करा
धर्मांतराचे जाळे : नाशिकमधील कुणाल असा झाला आतिफ

जगभरात मायक्रोचिपच्या तुटवड्यामुळे वाहन तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. यामुळे अनेक वाहन उत्पादकांना आपले उत्पादन कमी करावे लागले आहे. यासंदर्भात भारत आणि तैवान यांच्यांत चर्चा सुरु आहे. तैवान भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 55.36 हजार

कोटींची गुंतवणुकीस तयार आहे. त्यात 5G , वाहन उद्योग व इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये ही गुंतवणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्यजीत तांबे यांनी आज केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना मायक्रोचिपच्या कमतरतेची आठवण करून देत विनंतीवजा पत्र पाठवले आहे. यात सेमीकंडक्टर फॅबचे प्लांट नाशिकमध्ये उभारण्याची त्यांनी विनंती केली.

सेमीकंडक्टर उद्योगासाठी नाशिकची निवड करा
रणबीर-आलिया का पोहचले जोधपूरला?

नाशिक का सर्वोत्तम?

सेमीकंडक्टर फॅबकरिता नाशिक हे सर्वोत्तम ठिकाण आहे. कारण नाशिकमध्ये मुबलक पाणी आहे. कुशल मनुष्यबळ आहे. तसेच मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद या औद्योगिक पट्ट्याला जोडणारे रस्ते, रेल्वे व हवाई मार्ग आहे. तसेच नाशिक मध्ये वाहन आणि संलग्न उद्योगाचे जाळे उत्तम असल्याचे नमूद करत सत्यजीत तांबे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना नाशिक जिल्ह्याची निवड या प्लांटसाठी करावी असे या पत्रात सांगितले आहे. समृध्दी मार्ग, तसेच पुणे – नाशिक हायस्पीड रेल्वे ह्या सगळ्या प्रकल्पांमुळे नाशिकचं ह्या सेमीकंडक्टरच्या कारखान्यासाठी योग्य ठिकाण असल्याचे व त्या माध्यमातून नाशिक व उत्तर महाराष्ट्राला अपेक्षित रोजगार निर्मिती व प्रगती शक्य आहे.

Related Stories

No stories found.