
नाशिक | Nashik
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या (Nashik Graduate Constituency Election) मतमोजणीस (Vote Counting)आज सकाळी आठ वाजेपासून सुरूवात झाली होती. त्यानंतर सुरुवातील मतपत्रिकांची छाननी करून वेगवेगळे गठ्ठे करत २८ टेबलांवर मतमोजणी सुरु आहे...
नाशिक पदवीधरमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्यामध्ये अटीतटीची लढत होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
मतमोजणीच्या एकूण पाच फेऱ्या होणार असून पहिल्या फेरीची मतमोजणी सुरु आहे. या पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी मतमोजणी फेरीअंती सात ते आठ हजार मतांनी आघाडी घेतल्याचे समजते. तर मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील पिछाडीवर आहेत.
तर मतमोजणीच्या सुरुवातील टेबल नंबर १३ वर मतदार प्रतिनिधींची संख्या वाढल्याने गोंधळ झाला होता. मात्र, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Radhakrishna Game) यांनी तात्काळ पोलिसांच्या तुकडीला पाचारण करून दोन्ही बाजूच्या प्रतिनिधींना बाहेर काढले. त्यानंतर मतमोजणी सुरळीत सुरु झाली.
दरम्यान, यासोबतच बाद मतपत्रिकांची संख्या अधिक असल्याने आता कोटा किती निश्चित होतो? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. कोटा निश्चितीनंतरच खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.