Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशDRDO ची कोरोनावरील औषध लॉन्च

DRDO ची कोरोनावरील औषध लॉन्च

नवी दिल्ली :

DRDO च्या अँटी-कोविड औषध २-डीऑक्सी-डी-ग्लूकोज’ला (Anti-COVID drug 2DG) हे औषध सोमवारी बाजारात विक्रीसाठी लॉन्च करण्यात आले. संरक्षणमंत्री राजनाथसिंह व आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी हे औषध लॉन्च केले.

- Advertisement -

महत्वाची बातमी : मुलांसाठी या लसीला मिळाली मंजुरी

सध्या करोनाबाधित रुग्णांची ऑक्सिजन लेवल झपाट्याने कमी होणे ही मोठी समस्या आहे. यामुळे रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. यासाठी 2-DG हे औषध फायदेशीर ठरणार आहे. क्लिनिकल ट्रायलमधील परिणामांनुसार, कोरोनाबाधित रुग्ण कमी वेळेत रिकव्हर होतात. तसेच रुग्णांना रुग्णांलयात ऑक्सिजनचा वापरही कमी करावा लागत आहे. या औषधामुळे ऑक्सिजनवर अवलंबून असलेले कोरोनाबाधित रूग्ण २-३ दिवसांत ऑक्सिजनचा सपोर्टविना उपचार घेऊ शकतील, त्यामुळे रुग्ण लवकरच बरे होतील.मात्र रुग्णांनी हे औषध फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावे, असंही सतीश रेड्डी यांनी सांगितले.

DRDO ने विकसित केलेले हे औषध पावडर स्वरुपात मिळेल. हे पाण्यामध्ये टाकून घ्यावं लागते. हे औषध संसर्ग झालेल्या पेशींमधील विषाणूंचा संसर्ग कमी करण्यासोबत संसर्ग रोखण्याचं काम करत. त्यासोबतचं रुग्णाच्या शरीरातील उर्जा वाढवण्याचंही काम करते.

DRDO ने एप्रिल २०२० मध्ये या औषधावर काम करायला सुरुवात केली होती. त्यानंतर या औषधाच्या क्लिनिकल ट्रायल्सदरम्यान आढळून आलं की, हे औषध SARS-Cov-2 (कोविड-१९) या आजारावर प्रभावीपणे काम करते. दरम्यान, या औषधाच्या फेज-२ मधील क्लिनिकल ट्रायलला मे २०२० मध्ये परवानगी दिली होती. त्यानंतर मे-ऑक्टोबर २०२० मध्ये डीआरडीओ आणि डॉ. रेड्डी यांनी मिळून फेज-२ च्या ट्रायलला सुरुवात केली होती. फेज-२ची ट्रायल ६ रुग्णालयांमध्ये घेण्यात आली यामध्ये ११० रुग्णांवर याची चाचणी झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या