Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामविआला दणका; विधानसभेत 'हे' विधेयक मंजूर

मविआला दणका; विधानसभेत ‘हे’ विधेयक मंजूर

मुंबई Mumbai

शिंदे – फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Government) महाविकास आघाडी सरकारच्या काळात (mva government) घेण्यात आलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला आहे.

- Advertisement -

शिंदे – फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर काही दिवसातच सरपंचाची निवड (Sarpancha Election) ही जनतेतूनच होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता हे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे.

आजपासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Monsoon Session) सुरुवात झाली आहे. शिंदे – फडणवीस सरकारने आधीच्या सरकारने घेतलेले बरेचसे निर्णय मोडीत काढले आहेत. त्यातील एक महत्वाचा निर्णय थेट जनतेतून सरपंच निवड हा होता.

आज विधानसभेत (Legislative Assembly) महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक ग्रामविकासमंत्री (Rural Development Minister) गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मांडले आणि त्यानंतर हे विधेयक बहुमताने विधानसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे थेट सरपंचाची निवड आता जनतेतून होणार आहे.

दरम्यान, राज्यात याआधी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) नेतृत्वाखाली भाजप – शिवसेना (BJP-Shivsena) युतीचे सरकार असताना थेट सरपंचपदाच्या निवडणुकीचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र, राज्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर तो निर्णय रद्द केला होता. परंतु आता शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर हा निर्णय पुन्हा एकदा लागू करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या