सप्तशृंगीगड : ग्रामस्थांचा ५ डिसेंबरला गाव बंदचा निर्णय

jalgaon-digital
3 Min Read

सप्तशृंगीगड | वार्ताहर Saptshrungi Gad

सप्तशृंगी गडावर बुधवार ३० नोव्हेंबर सकाळी ११ वाजता सप्तशृंगीगड ग्रामपंचायत ( Saptshrungi Gad Grampanchayat )व सरपंच, सदस्य यांचा उपस्थित दोन ते तीनशे ग्रामस्थांचा सहकाऱ्याने ग्रामस्थ समवेत रोपवे ( Rope Way )व ट्रस्ट कर्मचाऱ्यांची विविध समस्या बाबत चर्चा करण्यात आली मात्र सप्तशृंगी गडाच्या ट्रस्ट व रोपवे मनमानी कारभारविरोधात सप्तशृंगी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत येत्या ५ डिसेंबर रोजी गाव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अनेक ग्रामस्थ लोकप्रतिनिधींनीच्या माध्यमातून पाठिंबा देण्यात आले आहे

.तसेच सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या माध्यमातून महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या ४० सुरक्षा रक्षकाची नेमणूक मंदिर परिरात केली असून हे सुरक्षारक्षक ग्रामस्थांना अपमानस्पद वागणूक देत असल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सप्तशृंगीगड ग्रामसभेत गावबंद एल्गार पुकारला आहे.

सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट चेअरमन व विसवस्त यांनी आपल्या पदाचा वापर करून मनमानीमुळे नव्याने एजन्सी माध्यमातून रूजू झालेल्या ४० सुरक्षा रक्षकाची हकालपट्टी करावी अशी मागणी सुद्धा ग्रामसभेत करण्यात आली असून याबाबत सप्तशृंगी देवी संस्थान काय भूमिका घेते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे .तसेच जुने सुरक्षा रक्षक यांना डावलून नवीन सुरक्षारक्षकाचा वेतनात मोठा फरक दिसून येत आहे,तसेच नवीन सुरक्षारक्षक यांचा वेतनावर एका वर्षासाठी सव्वा कोटी रुपये खर्च होणार असून भाविकांची देणगी देणाऱ्या पैशाची उधळपट्टी थांबवावी,याकरिता ५ डिसेंबर गावबंदिचा निर्णय घेण्यात आला आहे याच अनुषंगाने रोपवे ट्रॉली देखील बंद ठेवावे अशी सूचना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देण्यात आली आहे , यावेळी सप्तशृंगीगड ग्रामपंचायत सरपंच रमेश पवार,सदस्य सुवर्णा पवार,संदीप बेनके,राजेश गवळी,दत्तू बर्डे,जयश्री गायकवाड,ट्रस्ट व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे,उपव्यावस्थापक भगवान नेरकर,भिकन वाबळे,ग्रामसेवक संजय देवरे ,ग्रामस्थ अजय दुबे,रामप्रसाद बत्तासे ,विनायक दुबे,तसेच ग्रामस्थ व महिला वर्ग उपस्थित होते

वर्षाला सव्वा कोटी रुपये ( ४० ) सुरक्षा रक्षकावर खर्च करण्याऐवजी भाविकांचा विकासासाठी खर्च केले तर भाविक भक्तांची श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर भाविक भक्तांची वर्दळ होऊ शकते व येणारा भाविक आनंदाने सप्तशृंगी गडावर थांबा घेऊ शकतो

सप्तशृंगी गडावर येणारा भाविक देवी संस्थांचा कमी (रूम) भक्तनिवास अभावी नेहमी नाराज असतात याबाबत भक्तांचा भक्तनिवास दुरुस्तीसाठी राहण्याची सोय सुविधेकडे देवी संस्थां विसवस्त यांनी लक्ष दिले तर नव्याने ४० सुरक्षारक्षकावर खर्च करण्याऐवजी भविक भक्तांना भक्तनिवसाची कमतरते अभावी भाविकांना राहण्याची सुविधा कशी मिळेल याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे.

सप्तशृंगी गडावर रोपवे ट्रॉली येथे काम करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थ तरुण तरुणींना कमी वेतन व बाहेरील काम करणाऱ्यांना जास्त वेतन असल्याने रोपवे प्रशाशनाकडून दुजाभाव दिसून येत आहे याकडे रोपवे चेअरमन व्यवस्थापक का दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *