Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : 'सप्तशृंगी' मंदिरात भाविकांनी घेतले दर्शन

Video : ‘सप्तशृंगी’ मंदिरात भाविकांनी घेतले दर्शन

सप्तशुंगगड | Saptsrungi gad

सप्तशृंगी दर्शन आजपासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहेत.

- Advertisement -

आज सकाळी पोलीस यंत्रणा आणि संस्थान, ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आज सकाळी मंदिराला लावलेले बॅरिकेडिंग काढून भाविकांना आज प्रवेश देणे सुरू करण्यात आले.

आद्यस्वयंभु शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथिल श्री सप्तशृंगी माता मंदिर विश्वस्त संस्थेने यापूर्वी केंद्र शासनाने धार्मिक स्थळांना निर्धारित दिलेल्या कोविड-१९ संदर्भीय विविध मार्गदर्शक सूचना व मार्गदर्शक तत्वे विचारात घेता, नवरात्र उत्सव संबंधित केलेल्या नियोजना नुसार सर्व भाविकांसाठी नियम आखून दिले आहेत.

त्यानुसार, श्री भगवती मंदिरात प्रवेश करतांना मास्कचा वापर करणे बंधनकारक असणार असून, सोशियल डिस्टसंसचे पालन होणेकामी चिन्हांकित प्रकारात दर्शन मार्गावर आखणी केलेली आहे. यासह मंदिर मार्गावर विविध ठिकाणी थर्मल गन, ऑक्सिमिटर, सॅनिटायझर स्टँड व हात धुण्याच्या सुविधा उभारण्यात आलेल्या आहेत.

विश्वस्त संस्थेने यापूर्वी शासकीय व आरोग्य विभागाने निर्देशित केलेल्या कोविड-१९ संदर्भीय मार्गदर्शक तत्वे व सूचनेनुसार १ मार्च, २०२० रोजी उभारलेल्या करोना विषाणू संसर्ग – आरोग्य जनजागृती अभियान अंतर्गत केलेल्या विविध उपाययोजना व निर्धारित केलेल्या सेवा-सुविधा तसेच प्रक्रियेनुसार श्री भगवती दर्शन सुविधा आजपासून (दि. १६) भाविकांसाठी उपलब्ध करून दिली जात आहे.

एकाच वेळी होणारी गर्दी टाळत, आरोग्य संदर्भीय आवश्यक त्या सर्व खबरदारीसह कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक सूचनांचे योग्य प्रकारे पालन करत करोना विषाणूचा संसर्ग टाळणेकामी ठिकठिकाणी पहिली पायरी पासुन मंदिराच्या गाभारा पर्यत 5 फुटाच्या अंतरावर भाविकाचे नियोजन केले असुन मंदिरात जास्त गर्दी होऊन नये यासाठी ठिकठिकाणी देवी संस्थान चे कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे व माॅस लावुन मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.

प्रत्येक भाविकांने स्वयंपूर्तीने योग्य ते सहकार्य देवू करावे.तसेच सप्तशृंगी गडावर रोपवे ट्रॉली व ग्रामपंचायत सुद्धा भाविक भक्तांना मास्क लावण्यासाठी आव्हान करत आहे,

शासनाच्या आदेशानुसार दि १६/११/२०२० रोजी महाराष्ट्रात सर्व मंदिरे खुली करण्याचे आदेश प्राप्त झाला आहे.त्याप्रमाणे बाहेरगावाहुन येणाऱ्या भावीकभक्तांना मास्क कंपल्सरी असेल.ज्या भाविकांना मास्क नसेल त्यांना सप्तशृंगी गडावर ग्रामपंचायत दरडोई कर टोलनाक्यावर उपलब्ध होणार आहे.
– ग्रामसेवक एस.आर.देवरे, सप्तशृंगीगड

सप्तशृंगी गडावर रोपवे साठी अनेक ठिकाणी सॅनिटायझर तसेच मास्क,सुरक्षित अंतर, ठेवून भाविकांसाठी उपाययोजना केली आहे.
रोपवे व्यवस्थापक लूमबा सर,

गेल्या आठ महिन्यापासून मंदिर बंद होत मुख्यमंत्री यांनी आदेश देताच गडावरचे व्यापारी वर्ग आनंदित झाले आहे.तसेच अनेक नागरिकांनी मुख्यमंत्री यांचे आभार देखील मानले .

विवेक बेनके
समाजसेवक ,सप्तशृंगीगड

सप्तशृंगी गडावर सप्तशृंगी निवासनी देवी ट्रस्ट भाविकांना सोशल डीष्टन तसेच जागोजागी सॅनिटायझर उपाययोजना केली आहे

*अशी असणार नियमावली*

१) प्रार्थनास्थळ प्रर्वेशद्वाराजवळ सॅनिटायझर आणि टेंपरेचर चेकिंगची व्यवस्था असावी
ज्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत.त्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाईल.
३) मंदिराच्या आवारात कोरोनाप्रतिबंधक उपाययोजना तसेच घ्यावयाची काळजी याची माहिती देणारे फलक किंवा ध्वनिक्षेपण असावे
४) गर्दी टाळण्यासाठी मंदिराच्या आकारमानानुसार भाविकांना गटागटाने मंदिरात सोडले जावे
५) मूर्तीला तसेच तेथील पुतळे आणि पौथ्यांना स्पर्श करण्याची परवानगी नाही
६) प्रसाद व तीर्थ वाटप करू नये
७) मंदिराचा आवारात अन्नदान,भांडारा असेल तर तेथे योग्य त्या खबरदारीच्या योजना आखणे बांधकारक असेल
८) पादत्राणे शक्यतो भाविकांनी आपआपल्या वाहनात ठेवावीत किंवा कुटुंबाची वा गटाची पादत्राणे एकत्र ठेवावीत
९) मंदिरात शक्योतो येण्या -जाण्याचे मार्ग वेगळे असावेत
१०) गर्दी होऊ नये यासाठी प्रार्थना आणि भजने शक्यतो रेकॉर्डचच असावीत.भजनी मंडळांना प्रवेश देऊ नये
११)मंदिरातील पुजारी तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाविषयक नियम काटेकोरपणे टाळावेत.ज्या मंदिरात जास्त गर्दी असते.तेथील सर्वांची दर आठवड्याला कोरोना चाचणी करणे बांधकारक असेल.
१२) मंदिरातील फरशा तसेच अन्य पृष्ठभाग दिवसातून किमान तीन वेळा स्वच्छ करावेत.
१३) मंदिरात प्रसादवाटप किंवा भाविकांवर तीर्थ शिपडण्यास मनाई आहे
१४) प्रत्येक भाविकांने आपापले आसन स्वतः घेऊन जावे. मंदिरात सर्वांसाठी एकच सतरंजी वा आसन असू नये.

- Advertisment -

ताज्या बातम्या