पृथ्वी शॉला मारहाण करणं भोवलं; सपना गिलला कोर्टाचा मोठा दणका

पृथ्वी शॉला मारहाण करणं भोवलं; सपना गिलला कोर्टाचा मोठा दणका

मुंबई | Mumbai

पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. काही चाहत्यांनी पृथ्वी शॉ सोबत सेल्फी काढण्याची मागणी केली. मात्र, त्यांना नकार देताच वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की, काहींनी पृथ्वी शॉच्या मित्राच्या गाडीची काच फोडली...

व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक महिला पृथ्वी शॉ सोबत हुज्जत घालताना दिसून आली. व्हिडिओमध्ये पृथ्वी शॉ सोबत दिसणाऱ्या मुलीच नाव सपना गिल (Sapna Gill) आहे.

या प्रकरणात पोलिसांनी सपना गिलला अटक केली. पृथ्वी शॉ याला मारहाण करणे सपना गिलला चांगलेच भोवले आहे. कोर्टाने (Court) सपना गिलला मोठा दणका दिल्याची माहिती मिळत आहे.

पृथ्वी शॉला मारहाण करणं भोवलं; सपना गिलला कोर्टाचा मोठा दणका
'पृथ्वी शॉ'बरोबर भररस्त्यात हाणामारी करणारी 'सपना गिल' आहे तरी कोण?

पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रांनी सपना गिल आणि तिच्या मित्रांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. ही तक्रार गुरुवारी ओशिवरा पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात दाखल झाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

पृथ्वी शॉला मारहाण करणं भोवलं; सपना गिलला कोर्टाचा मोठा दणका
...अन् सुषमा अंधारेंचा १८ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ सापडला

न्यायालयाने सपनाला २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. त्यामुळे आता तीन दिवस सपना पोलिसांच्या कोठडीत असेल. या तीन दिवसांमध्ये पोलिस तिची कसून चौकशी करतील. पण या चौकशीला सपना कशी सामोरी जाते, हे महत्वाचे असेल. कारण सपनाने जर पोलिसांना सहकार्य केले नाही तर तिची ही कोठडी अजून वाढण्याची शक्यता आहे.

पृथ्वी शॉला मारहाण करणं भोवलं; सपना गिलला कोर्टाचा मोठा दणका
इतिहासात भोपळा, कलेत मात्र १००...; मार्कशीट व्हायरल करत राष्ट्रवादीनं कोश्यारींना डिवचलं
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com