४८ जागा लढवायला आम्ही मूर्ख आहोत का?; बावनकुळेंच्या 'त्या' विधानाचा संजय शिरसाटांनी घेतला समाचार

संजय शिरसाट
संजय शिरसाट

मुंबई | Mumbai

पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत शुक्रवारी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP state president Chandrasekhar Bawankule) यांनी एक विधान केले होते. त्यात ते म्हणाले होते की, आगामी निवडणुकांमध्ये भाजप कडून शिंदे गटाला ४८ जागा देण्यात येणार आहे. या विधानामुळे शिंदे गटामध्ये कुरबुर निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांच्या त्या वक्तव्याचा संजय शिरसाट यांनी समाचार घेतला आहे.

शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानावर करत, ४८ जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का?, बावनकुळेंनी केलेल्या विधानामध्ये काही दम नाही. त्यांना एवढे कोणी अधिकार दिलेले नाहीत, अशा शब्दात संजय शिरसाटांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

तसेच शिरसाठ पुढे म्हणाले, असे स्टेटमेंट दिल्याने युतीमध्ये बेबनाव होतो. याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे, असा सल्लाही संजय शिरसाट यांनी बावनकुळेंना दिला आहे. ४८ जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का? याची वरिष्ठ पातळीवर बैठक होईल. त्या बैठकीत वरिष्ठ जो निर्णय घेतील तो त्यांना जाहीर करू द्या. तुम्हाला अधिकार कोणी दिला. अशामुळे पक्षात असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल होते, असेही ते म्हणाले.

संजय शिरसाट
लाल वादळ शमलं! सरकारच्या आश्वासनानंतर लॉन्ग मार्च स्थगित

खरंतर आगामी विधानसभा (Assembly) निवडणुकीत भाजप २४० जागा लढणार असून, शिंदे गटाकडे ५० हून अधिक जागा लढण्यासाठी नेतेच नाहीत, असे म्हणत शिंदे गटाला ४८ जागा देणार आहोत, असं वक्तव्य भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं होतं.

संजय शिरसाट
Nashik : ...तर आज राजकीय चित्र वेगळं असतं; नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

विशेष म्हणजे युतीतील जागावाटपाबाबत संयम न ठेवता वक्तव्य केल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लगेच सारवासारव करावी लागली होती. चंद्रशेखर बावनकुळेंचा तो व्हिडीओसुद्धा भाजपकडून तातडीने हटवण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

भाजप पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत शुक्रवारी बोलताना बावनकुळेंनी हे विधान केलं होतं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजप २४० जागा लढविणार असल्याचे सांगून पदाधिकाऱ्यांनी रात्रंदिवस काम करीत निवडणूक तयारीला लागावे असेही म्हटले होते, त्यांचे भाषण समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आले होते. त्यानंतर तो व्हिडीओ हटवून त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी खुलासाही केला. मात्र त्यांच्या या विधानामुळे शिंदे गट नाराज झाल्याचे दिसून येते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com