Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याहा तर विरोधकांचा डाव; 'त्या' नोटीसला संजय राऊतांचे उत्तर

हा तर विरोधकांचा डाव; ‘त्या’ नोटीसला संजय राऊतांचे उत्तर

मुंबई | Mumbai

विधीमंडळाच्या (Legislature) कथित अवमान प्रकरणात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना हक्कभंग समितीने नोटीस बजावली होती. या नोटीस ला संजय राऊत यांनी एका पत्राद्वारे उत्तर दिले.

- Advertisement -

‘आपण विधीमंडळाचा कुठलाही अवमान केलेला नाही’, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे, दरम्यान विरोधकांनी आपल्याविरोधात हा डाव रचला आहे, असा आरोप त्यांनी यासंदर्भात केला.

शौचालयास जाऊ न दिल्याच्या कारणावरून लॉज मालकासह तिघांना बेदम मारहाण

दरम्यान, हक्कभंग समितीविरोधात आक्षेपही त्यांनी नोंदविला आहे, “हक्कभंग समिती ही स्वतंत्र तसेच तटस्थ स्वरुपाची असायला हवी होती, पण समितीत फक्त माझ्या राजकीय विरोधकांना स्थान दिले आहे, हे संसदीय लोकशाही (Parliamentary democracy) परंपरेला धरुन नाही.

भरदिवसा घरफोडी; हजारोंचा ऐवज लंपास

त्याबरोबरच पुढे ते म्हणाले, विधीमंडळाबद्दल मला कायमच आदर राहिला आहे. विधीमंडळाची अप्रतिष्ठा होईल असं कोणतंही विधान मी केलेलं नाही. तरीही माझ्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करणं हा विरोधकांचा डाव आहे, यावर माझी काही हरकत नाही.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

पण माझं विधान नेमकं काय होतं ते ही पाहा असे ते म्हणाले आहेत. आम्हाला सगळी पदं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहेत. त्यांनीच शिवसेना निर्माण केली आहे. त्यामुळे सध्याचं डुप्लिकेट शिवसेनेचं मंडळ हे विधीमंडळ नसून चोरमंडळ आहे, असं संजय राऊत यांनी आपल्या उत्तरात्त स्पष्टीकरण दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या