'मुख्यमंत्र्यांच्या मुलाकडून माझ्यावर हल्ल्याची सुपारी'; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

'मुख्यमंत्र्यांच्या मुलाकडून माझ्यावर हल्ल्याची सुपारी'; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

मुंबई | Mumbai

शिंदे आणि ठाकरे गटाच्या वादाने आता वेगळे वळण घ्यायला सुरुवात केली आहे, एकमेकावर टीका-टिपण्णी, आरोप प्रत्यारोप होत असताना आता, ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक धक्कादायक आरोप करत, खळबळ उडवली आहे.

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केले आहे. संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

त्यासाठी एका गुंडाला सुपारी दिली गेली असल्याचे त्यांनी म्हटले आहे, अशा आशयाचे एक पत्र संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांना लिहिले आहे.

'मुख्यमंत्र्यांच्या मुलाकडून माझ्यावर हल्ल्याची सुपारी'; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
भाजपच्या माजी मंत्र्यांचा उद्धव ठाकरेंच्या 'त्या' मागणीला पाठिंबा

खा. संजय राऊत यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,

"गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना (representative) धमक्या देण्याचे व हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली. माझी त्याबद्दल तक्रार नाही. असे राजकीय निर्णय होत असतात.

लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे व गृहमंत्री (Home Minister) म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात, तरीही एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर (Raja Thakur) व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे." या पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

'मुख्यमंत्र्यांच्या मुलाकडून माझ्यावर हल्ल्याची सुपारी'; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
धक्कादायक! पिंपळगाव बसवंतच्या युवकाची मालेगावात आत्महत्या
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com