संजय राऊतांची भाजपवर जोरदार टीका; म्हणाले...

संजय राऊतांची भाजपवर जोरदार टीका; म्हणाले...
संजय राऊत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) आहेत. शिवसेना नगरसेवक डी. जी. सुर्यवंशी यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले...

यावेळी संजय राऊत म्हणाले की, नाशिक महानगरपालिकेत शिवसेनेचे १०० नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास संजय राऊत त्यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र स्वतंत्र झाला, या शब्दांत राऊत यांनी हल्लाबोल केला.

ते पुढे म्हणाले की, १९४७ मध्ये जसे आंदोलन झाले. 'चलेजाव'ची चळवळ झाली म्हणून ब्रिटिश सरकार पळाले. तसेच जनता रस्त्यावर आली असती कोण पंतप्रधान, कोण गृहमंत्री आहे हे जनतेने पाहिले नसते. त्यामुळेच कायदे घेतल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. आम्ही करेक्ट कार्यक्रम करत महाराष्ट्राला दोन वर्षापूर्वी स्वतंत्र करत भगवा फडकवला, असे टोलादेखील संजय राऊत यांनी लगावला आहे.

संजय राऊत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या कृषी कायदे मागे घेतल्यानंतरच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सडकून टीका केली. “चंद्रकांत पाटील यांना दुःख वाटत असेल, तर त्यांना शोक संदेश पाठवू शोकसभा आयोजित करू, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com