Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवारांच्या 'त्या' टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर

शरद पवारांच्या ‘त्या’ टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर

मुंबई | Mumbai

कर्नाटकात (Karnataka) आज विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ७ वाजेपासून मतदान सुरू झाले असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. तसेच १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) कर्नाटक निवडणुकीवरुन भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिले आहे…

- Advertisement -

राऊतांनी म्हटले की, कर्नाटकात आज मतदान होत असून लोकांमध्ये उत्साह आहे. देशाचे पंतप्रधान महिनाभर कर्नाटकात तंबू ठोकून होते. गृहमंत्री आणि सर्व मंत्री बसले होते. पण कर्नाटकात इतिहास घडेल. २०२४ साठी शुभसंकेत होईल. भाजपचा दारूण पराभव होणार असून हा पंतप्रधानांचा पराभव असेल, असेही त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, कर्नाटकाचा निकाल कलाटणी देणारा असेल. कर्नाटक हे दक्षिणेतील महत्त्वाचे राज्य आहे. दक्षिणेतील एकमेव राज्य भाजपकडे आहे. ते राहणार नाही. मोदी आणि शाह यांच्यापासून संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, भाजपचे नेते आणि विविध राज्यातील मुख्यमंत्री कर्नाटकात ठाण मांडून बसले होते. पैशाचा महापूर झाला. बजरंग बलीलाही निवडणुकीत उतरवलं. पण यांना कोणताही देव पावणार नाही. बजरंगबलीच त्यांच्या डोक्यात गदा मारणार आहे. हनुमानाची गदा यांच्या डोक्यात पडणार आहे, असे म्हणत राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला.

तसेच दोन दिवसांपूर्वी सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना ”सामनाला महत्व देत नाही” असे म्हटले होते. शरद पवारांच्या या विधानावर देखील संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

यावेळी संजय राऊत म्हणाले की, ‘सामना’ गेल्या ४० वर्षापासून राजकीय भाष्य करत आहे. जेव्हा तुमच्यासोबत कोणी नव्हतं तेव्हा सामना तुमची बाजू घेत होता. तुम्हाला काही खटकत असेल तर तुम्ही तुमचं म्हणणं मांडावं. मी माझ्या पक्षाचं म्हणणं मांडत असतो. तुमच्याकडे काही असेल तर बोला. बोलण्याची हिंमत ठेवा, असे सांगतानाच ‘सामना’ला महत्त्व द्या असे मी कुठे म्हणतो, असेही ते म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या