…तर हे येणारा भविष्यकाळ ठरवेल; पटोलेंच्या ‘त्या’ टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर

मुंबई | Mumbai

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांचा उल्लेख करत काँग्रेसमध्ये (Congress) निर्णय राहुल गांधी (Rahul Gandhi) किंवा गांधी कुटुंब घेत असल्याचे वक्तव्य केले होते…

त्यानंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उत्तर देत राऊतांनी चाटूगिरी करू नये. ते काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत. गांधी परिवारावर हे लांच्छन लावणं सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. गांधी परिवार त्यागाचा परिवार आहे. पंतप्रधानपद त्या कुटुंबाने सोडलं आहे. राहुल गांधींनी राष्ट्रीय अध्यक्षपद सोडलं आहे. मल्लिकार्जून खर्गे हे आमचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांचा मोठा अनुभव आहे. ते अनेक वर्ष आमदार-खासदार होते. त्यामुळे संजय राऊतांनी हा चोमडेपणा थांबवावा, अशी टीका नाना पटोलेंनी केली होती.

पटोलेंच्या या टिकेवर आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, चाटुगिरी कोण करतं हे येणारा भविष्यकाळ ठरवेल. शिवसेनेने कधीही अशी भूमिका घेतलेली नाही. तुम्ही महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) आहात, त्यामुळे आपल्या तोंडावर बंधन घाला. आम्ही तुमच्याविषयी बोलू लागल्यास चोमडे कोण आणि चाटू कोण हे कळेल. असे म्हणत त्यांनी पटोलेंवर निशाणा साधला आहे.