Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवारांच्या अदानी समूहाबाबतच्या भूमिकेमुळे मविआत फूट पडणार? राऊत म्हणाले...

शरद पवारांच्या अदानी समूहाबाबतच्या भूमिकेमुळे मविआत फूट पडणार? राऊत म्हणाले…

मुंबई | Mumbai

अदानी प्रकरणात जेपीसी (JPC) स्थापन करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसकडून (Congress) करण्यात आली होती. त्यातच काल माध्यमांशी बोलतांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी जेपीसीत सत्ताधाऱ्यांचीच संख्या अधिक असेल, त्यामुळे जेपीसी गठीत करून काहीच उपयोग नाही. १९ विरोधी पक्ष एकत्र आले तरी सर्वांना स्थान मिळणार नाही, त्यामुळे जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समितीच अधिक योग्य राहिल. तसेच अदानी यांना जाणून-बुजून टार्गेट करण्यात येत असल्याचे म्हटले होते.

- Advertisement -

त्यावर आता काँग्रेस पुढे काय भूमिका घेणार ? शरद पवारांच्या वक्तव्यामुळे मविआत फूट पडणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवारांनी ‘नॉट रिचेबल’च्या वृत्तावर दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

यावेळी राऊत म्हणाले की, पवार साहेबांनी अदाणींसंदर्भात वेगळी भूमिका घेतली असली तरी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचे तडे जाणार नाहीत. एलआयसी आणि स्टेट बँकेमधील पैसे हे जनतेचे पैसे आहेत. ते कशा प्रकारे भाजपने (BJP) आपल्या जवळच्या उद्योगपतींच्या खिशात घातले हे समोर आले. लोकांना काही नवीन माहिती मिळाली. एका उद्योगपतीसाठी संपूर्ण देशाची शक्ती कशी पणाला लावत आहेत हे सुद्धा समोर आल्याचे त्यांनी म्हटले.

गौरवास्पद! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी घेतली सुखोई-३० एमकेआयमधून भरारी

राऊत पुढे म्हणाले की, जेपीसीने काही साध्य होणार नाही. जेपीसीचा अध्यक्ष भाजपचा असतो. त्यात बहुमत भाजपचे असते. जे त्यांना पाहिजे तसाच ते रिपोर्ट बनवणार आहेत. शरद पवारांनी न्यायालयीन चौकशीचा पर्याय दिला आहे. ममता बॅनर्जी असो, तृणमूल काँग्रेस किंवा एनसीपी अदाणींच्या बाबतीत त्यांचे वेगळे मत असू शकते. परंतु त्यामुळे विरोधकांच्या एकजुटीत महाराष्ट्रात किंवा राष्ट्रीय स्तरावर कोणतीही फूट पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

अदानी प्रकरणी JPCची गरज नाहीच, पण का?.. जाणून घ्या, काय म्हणाले शरद पवार?

तसेच राऊतांनी पुढे मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Tour) देखील सडकून टीका केली. ते म्हणाले की, ‘प्रभू श्रीराम हे सर्वांचे आहेत. राम हे सत्य वचनी होते. रामाच्या चरणी जाऊन कुणाची पाप धुवायची इच्छा असेल. जे लोक आता अयोध्यात जात आहेत. त्यांना मार्ग आम्हीच दाखवला आहे, असेही खासदार राऊत म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या