अमृता वहिनी गप्प कशा बसल्या? तेथेच एक सणसणीत...; बाबा रामदेव प्रकरणी संजय राऊत भडकले

अमृता वहिनी गप्प कशा बसल्या? तेथेच एक सणसणीत...; बाबा रामदेव प्रकरणी संजय राऊत भडकले

मुंबई | Mumbai

राज्यात वादग्रस्त विधानांवरून रान पेटलेले असतानाच आज ठाण्यातील एका कार्यक्रमात रामदेव बाबांनी महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केलं आहे.

या विधानाचा सर्वच स्तरांतून निषेध करण्यात येत असून विरोधकांनी रामदेव बाबांवर टीकेची झोड उठवली आहे. तर, संजय राऊत यांनीही जोरदार टीका केली आहे. लज्जास्पद विधान केल्यानंतरही अमृता वहिनी गप्प कशा बसल्या, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहेत.

बाबा रामदेव यांच्यावर टीका करताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, हे लज्जास्पद विधान केलं असताना उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी तिथे बसलेल्या होत्या. असं असताना आमच्या अमृता वहिनी गप्प कशा बसल्या? असं विधान करणारा कोणीही आणि कितीही मोठा असो त्याच्या सणसणीत कानाखाली बसायला हवी होती असं राऊत म्हणाले.

तसेच एका बाजूला तुम्ही महिला सबलीकरणाच्या गोष्टी करतात, ज्ञान पाजळतात. त्याचवेळेला एक बाब, भगवे वस्त्र परिधान करणारा महिलांचा अपमान करतो. राज्यपाल शिवाजी महाराजांचा अपमान करतात, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर,सांगली खेचून घेण्याची भाषा करतात आणि हे सरकार शांत बसतं. या सरकारची जीभ दिल्लीला गहाण ठेवलीय का हे मला पाहायचं आहे असा टोलाही त्यांना सरकारला लगावला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com