संजय राऊत लवकरच नाशिक दौऱ्यावर

संजय राऊत लवकरच नाशिक दौऱ्यावर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

तब्बल तीन महिन्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत काल तुरुंगाबाहेर आले. आज सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाददेखील साधला...

दरम्यान नाशिकमधील शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी संजय राऊत यांच्या घरी मुंबई येथे त्यांचा सत्कार केला. यावेळी संजय राऊत यांनी नाशिकबाबत आढावा घेऊन लवकरच नाशिक दौरा करणार असल्याचे सांगितले, अशी माहिती माजी महापौर विनायक पांडे यांनी दिली आहे.

यावेळी माजी आमदार वसंत गीते, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, ज्येष्ठ नेते शिशिर शिंदे, राजेंद्र देसाई आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com