राज ठाकरे यांना संजय राऊत का भेटले?

राज ठाकरे यांना संजय राऊत का भेटले?

मुंबई

शिवसेना नेते संजय राऊत(sanjay raut) यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray)यांच्या नव्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत (sanjay raut)यांनी घेतलेल्या या भेटीमुळे पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

राज ठाकरे यांना संजय राऊत का भेटले?
हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन होता. त्यामुळे संजय राऊत आज शिवतीर्थावर सपत्नीक आले होते. शिवसेना प्रमुखांना अभिवादन केल्यानंतर राऊत यांनी थेट राज ठाकरे (raj thackeray)यांचं नवं घर गाठलं. राऊत यांच्या मुलीचं 29 नोव्हेंबर रोजी लग्न आहे. या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राऊत सपत्नीक राज यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आले होते. यावेळी राज आणि राऊत यांच्यात मनमोकळ्या गप्पा झाल्या. ही कौटुंबीक भेट होती. त्यानंतर राऊत आणि त्यांची पत्नी जायला निघाले. तेव्हा राज ठाकरे, शालिनी ठाकरे आणि अमित ठाकरे हे गेटपर्यंत त्यांना सोडायला आले. राज ठाकरे टीशर्टवरच होते. यावेळी राऊत यांनी गेटवर उभं राहून राज यांचं नवं घर न्याहाळलं. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगितलं जातं. मात्र, तरीही या भेटीने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com