संजय राऊतांची ठाणे पोलिसांकडून नाशकात चौकशी, काय आहे प्रकरण?

संजय राऊतांची ठाणे पोलिसांकडून नाशकात चौकशी, काय आहे प्रकरण?

नाशिक | Nashik

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून ठाण्याचे खासदार श्रीकांत शिंदेंनी आपल्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातील गुंड राज ठाकूरला सुपारी दिली असा खळबळजनक आरोप केला होता. यानंतर राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे...

त्यातच संजय राऊत हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते आज एका कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. तर दुसरीकडे हल्ला करण्याच्या आरोपानंतर शहरातील हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये (Hotel Express Inn) ठाण्याचे (Thane) एसीपी ६ जणांच्या पथकासह संजय राऊत यांचा जबाब नोंदविण्यासाठी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांच्या रूमच्या बाहेरही पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

संजय राऊतांची ठाणे पोलिसांकडून नाशकात चौकशी, काय आहे प्रकरण?
“…नाहीतर रस्त्यावर ‘पवार-पवार’ ओरडत फिरण्याची वेळ येईल”

दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी (Amit Shah) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना खा. संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यानंतर याप्रकरणी नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते योगेश बेलदार यांच्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे शहरात राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे.

संजय राऊतांची ठाणे पोलिसांकडून नाशकात चौकशी, काय आहे प्रकरण?
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा दुसरा दिवस, आजही ठाकरे गटच मांडणार बाजू
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com